शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

आराम बस अपघातात ५ ठार

By admin | Updated: September 22, 2014 02:20 IST

पहाटेच्यावेळी दाट धुक्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने भरधाव खासगी आराम बस झाडावर आदळून झालेल्या अपघातात चार जण जागीच ठार झाले

सावर्डे (जि. रत्नागिरी) : पहाटेच्यावेळी दाट धुक्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने भरधाव खासगी आराम बस झाडावर आदळून झालेल्या अपघातात चार जण जागीच ठार झाले, तर एका महिलेचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. गाडीतील अन्य २७ प्रवासी जखमी झाले असून त्यातील पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात मुंबई-गोवा महामार्गावरील सावर्डेनजीकच्या असुर्डे (ता. चिपळूण) गावी घडला. सुनील गंगाराम कांबळे (२७), सतेज प्रभाकर वेतकर (१७) महेंद्र महादेव तांबे (३०) व एक अज्ञात प्रवासी असे चार जण जागीच ठार झाले. अज्ञात प्रवाशांच्या चेहऱ्याचा चेंदामेंदा झाला असून त्याच्याजवळ ओळख पटू शकेल, अशी कोणतीही कागदपत्रे सापडली नाहीत. त्यामुळे या व्यक्तीची ओळख पटवणे पोलिसांसाठी अवघड बनले आहे. गंभीर जखमी झालेल्या प्रियंका विनोद वेतकर (४५) यांना म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.साईपूजा ट्रॅव्हल्सची बस वरळीहून विजयदुर्गकडे येत होती. पहाटे असुर्डे घाटात धुके असल्याने चालक सुनील विष्णू टिकम (४७) रस्त्याचा अंदाज येत पहाटे सव्वापाचच्या सुमारास असुर्डे ग्रामपंचायत कार्यालयासमोरील अवघड वळणावर ताबा सुटल्यामुळे बस रस्त्यालगतच्या एका झाडावर आदळली. बसमधील दिलीप तुकाराम पाडाळे (५३), अनिल विठोबा झिमण (२८), अमित जाधव (३०), पंकज तानाजी आतवकर (२५) आणि आत्माराम सीताराम वारीक (६२) या प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. (वार्ताहर)