शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
3
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
4
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
5
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
6
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
7
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
8
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
9
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
10
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
11
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
12
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
13
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
14
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
15
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
16
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
17
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
18
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
19
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
20
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
Daily Top 2Weekly Top 5

नायब तहसीलदारांना मृत्युपूर्व बयाणाच्या कामातून मुक्त करा!

By admin | Updated: August 4, 2016 23:53 IST

तहसीलदार-नायब तहसीलदार संघटनेचे शासनाला साकडे.

संतोष येलकरअकोला, दि. ४- राज्यात महसूल विभागांतर्गत नायब तहसीलदारांकडे आधीच भरपूर कामांचा व्याप असताना, मृत्युपूर्व बयाण घेण्याच्या कामात वेळ द्यावा लागतो. त्यामुळे मृत्युपूर्व बयाण घेण्याच्या कामातून नायब तहसीलदारांना मुक्त करण्यात यावे, यासाठी महाराष्ट्र राज्य तहसीलदार-नायब तहसीलदार संघटनेच्यावतीने शासनाला साकडे घातले आहे.महसूल विभागांतर्गत राज्यातील तहसीलदारांना गौण खनिज, शासनामार्फत उपलब्ध होणारे विविध प्रकारचे अनुदान वाटप, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन, राजशिष्टाचार, निवडणुका, कायदा व सुव्यवस्था, महसूल प्रकरणे, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, दाखले वाटप अशी विविध प्रकारची कामे करावी लागतात. त्यातच मृत्युपूर्व बयाण नोंदविण्याचे कामदेखील नायब तहसीलदारांना करावे लागत आहे. महसूल विभागांतर्गत विविध प्रकारची कामे करताना मृत्यू बयाण नोंदविण्याच्या कामासाठी वेळ देणे कठीण होते. त्यामुळे राज्यातील नायब तहसीलदारांकडून मृत्युपूर्व बयाण नोंदविण्याचे काम काढून टाकण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य तहसीलदार-नायब तहसीलदार संघटनेच्यावतीने शासनाकडे करण्यात येत आहे. येत्या आठवडाभरात यासंदर्भात शासनाच्या महसूल व गृह विभागाकडे संघटनेच्यावतीने निवेदन दिले जाणार आहे.मृत्युपूर्व बयाणाचे काम विशेष कार्यकारी दंडाधिका-यांकडे द्या!मृत्यू बयाण नोंदविण्याचे काम नायब तहसीलदारांकडून काढण्यात यावे. या कामासाठी विशेष कार्यकारी दंडाधिकार्‍यांची नेमणूक करून, त्यांच्याकडून मृत्यू बयाण नोंदविण्याचे काम करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य तहसीलदार-नायब तहसीलदार संघटनेमार्फत शासनाकडे करण्यात येत आहे.------"नायब तहसीलदारांना विविध प्रकारची कामे करावी लागतात. त्यामध्येच मृत्युपूर्व बयाण घेण्याच्या कामासाठी नायब तहसीलदारांना वेळ देणे कठीण होते. त्यामुळे मृत्युपूर्व बयाण नोंदविण्याच्या कामातून नायब तहसीलदारांना मुक्त करण्यात यावे आणि मृत्युपूर्व बयाण नोंदविण्याच्या कामासाठी विशेष कार्यकारी दंडाधिकार्‍यांची नेमणूक करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे."-सुरेश बगळेअध्यक्ष, महाराष्ट्र राज्य तहसीलदार-नायब तहसीलदार संघटना