शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

कोरड्या दुष्काळाच्या छायेत बंधाऱ्यांचे लोकार्पण

By admin | Updated: August 14, 2014 01:16 IST

कोरड्या दुष्काळाच्या छायेत जलसंधारण व (लघुसिंचन) व कृषी विभागाच्यावतीने बांधण्यात आलेल्या साखळी सिमेंट नाला बंधाऱ्यांच्या लोकार्पणाचा कार्यक्रम शासनाने निश्चित केला आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येचा मुहूर्त : अनेक ठिकाणचे बंधारे कोरडेचअमरावती : कोरड्या दुष्काळाच्या छायेत जलसंधारण व (लघुसिंचन) व कृषी विभागाच्यावतीने बांधण्यात आलेल्या साखळी सिमेंट नाला बंधाऱ्यांच्या लोकार्पणाचा कार्यक्रम शासनाने निश्चित केला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच शुक्रवार १४ आॅगस्ट रोजी हा कार्यक्रम राज्यभर होणार आहे. राज्यातील ३ हजार २२५ बंधाऱ्यांचे लोकार्पण यावेळी केले जाईल. यामध्ये अमरावती विभागातील ४८१ बंधाऱ्यांचा समावेश आहे. मात्र, पावसाअभावी विदर्भासह मराठवाड्यात कोरड्या बंधाऱ्यांचे लोकार्पण करण्याची वेळ लोकप्रतिनिधींवर आली आहे. राज्यात २०११-१२ पासून हा उपक्रम राबविला जात आहे. २०१२-१३ मध्ये १ हजार ४८७ बंधाऱ्यांचे ९ जून २०१३ रोजी लोकार्पण झाले होते. त्यानंतर जलसंधारण विभागाच्या २७२ लघुसिंचन प्रकल्पांचे १३ जानेवारी २०१४ रोजी लोकार्पण झाले. अमरावतीसह राज्यभरात तिसऱ्यांदा ३ हजार २२५ बंधाऱ्यांचे लोकार्पण होणार आहे. दुष्काळ सदृश परिस्थितीत जिल्ह्यात व इतर ठिकाणी बंधाऱ्यांची झालेली कामे शेतकऱ्यांसह नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाची आहेत.बंधाऱ्यात पाणी थांबल्यामुळे जमिनीच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे. त्याचबरोबर विहिरींची पाणी पातळी वाढणार आहे. अमरावतीसह राज्यातील २१२ तालुक्यांतील १ हजार ३१६ गावांमध्ये कृषी विभागाने १ हजार ४२४ तर लघुसिंचन विभागाने १ हजार ८०१ बंधारे बांधले आहेत. त्या बंधाऱ्यांचा लोकार्पण संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. त्या कार्यक्रमाच्या तयारीत शासनाचा लघुसिंचन विभागातील अधिकारी कर्मचारी लागले आहेत. राज्यातील अनेक भागांमध्ये यंदा पाऊस झालेला नाही. लोकार्पण सोहळा होत असताना ज्याठिकाणी सर्वाधिक बंधारे बांधण्यात आले तेच बंधारे कोरडे पडले आहेत. त्याचा सर्वाधिक फटका मराठवाडा व विदर्भालाही बसला आहे. काही ठिकाणी झालेल्या रिमझिम पावसाने काही बंधाऱ्यांमध्ये पाणीच साचलेले नाहीत. बंधारे कोरडे असले तरीही शासनाने त्याचे लोकार्पण करण्याचे फर्मान काढल्याने कोरड्या बंधाऱ्यांचे लोकार्पण करण्याशिवाय अधिकाऱ्यांपुढे पर्याय उरलेला नाहीत. (प्रतिनिधी)