शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

लांजाजवळ आरामबस दरीत कोसळली

By admin | Updated: September 5, 2016 04:33 IST

खासगी आरामबस आंजणारी घाटीत शंभर फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार

लांजा (जि.रत्नागिरी) : मुंबईहून कुणकेश्वर (जि. सिंधुदुर्ग) येथे जाणारी खासगी आरामबस आंजणारी घाटीत शंभर फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार, तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात मुंबई-गोवा महामार्गावर रविवारी पहाटे घडला.प्रकाश रावजी लब्धे (५४, विरार, मुंबई), कृष्णा दत्ताराम मुळ्ये (३५, राजापूर) अशी मृतांची नावे असून प्राजक्ता प्रकाश लब्धे (कुणकेश्वर), प्रथमेश प्रकाश लब्धे (कुणकेश्वर), शुभांगी राजेंद्र राड्ये (१९, तरळे, कणकवली) हे तीनजण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रत्नागिरीला हलविण्यात आले आहे.ही आरामबस कुणकेश्वरला जाण्यासाठी शनिवारी रात्री मुंबईच्या परेलहून निघाली. चालक गणेश नारायण डामरे (३८, कणकवली) हा भरधाव बस चालवीत होता, असे प्रवाशांनी सांगितले. रविवारी पहाटे तीनच्या सुमारास आंजणारी घाट उतरत असताना एका वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले व रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या झाडावर जाऊन बस आदळली. त्यानंतर ती खोल दरीत गेली. या अपघातात अन्य १३ जण किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर लांजा ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. (प्रतिनिधी)बसचालक-मालकावर गुन्हाया अपघातास जबाबदार चालक गणेश डामरे आणि बसमालक राजेश विश्वनाथ गवाणकर (सांताक्रुझ, मुंबई) या दोघांवर लांजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.वाहतूक खोळंबलीदरीत कोसळलेल्या खासगी आरामबसला बाहेर काढण्यासाठी रत्नागिरीहून क्रेन बोलावण्यात आली होती. ही बस काढत असताना जवळपास तीन तास महामार्गावरील वाहतूकथांबविण्यात आल्याने इतर प्रवाशांना याचा फटका बसला.>दोन झाडे पाडली : हा अपघात एवढा भीषण होता की, दोन झाडे पाडत ही बस दरीत कोसळली. त्यातील काही प्रवाशांनी दरीतून वर येऊन अपघाताची कल्पना दिली.