शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपुरात मृताच्या नातेवाईकांनी केली रुग्णालयाची तोडफोड

By admin | Updated: November 7, 2016 16:35 IST

पोटाच्या विकारासाठी उपचाराकरता दाखल केलेल्या महिलेचा उपचारादरम्यान २ दिवसांपूर्वीच मृत्यू झाला

ऑनलाइन लोकमतसोलापूर, दि. 7 - पोटाच्या विकारासाठी उपचाराकरता दाखल केलेल्या महिलेचा उपचारादरम्यान २ दिवसांपूर्वीच मृत्यू झाला असतानाही संबंधित डॉक्टरांनी नातेवाईकांपासून ही माहिती लपवून ठेवल्याचा आरोप करत संतप्त झालेल्या नातेवाईकांनी मेडिकेअर आयसीयूची तोडफोड केली आहे. पंढरपूर शहरातील सुनीता आंबेकर या ३५ वर्षीय महिलेस तिच्या नातेवाईकांनी शनिवारी अपेंडिक्सच्या आजारावर उपचार करण्यासाठी डॉक्टर टकले यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. शनिवारी संध्याकाळी सुनीता यांच्यात अपेंडिक्स आजाराची शस्त्रक्रिया पूर्ण झाली. मात्र काही वेळानंतर रुग्णाची प्रकृती गंभीर झाल्याने सुनीता यांना मेडिकेअर आयसीयूत दाखल करण्याचा निर्णय हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी घेतला. कोणत्याही नातेवाईकांना रुग्णाच्या जवळ जाण्यास डॉक्टरांनी मनाई केल्याचं नातेवाईकांचं म्हणणं आहे . मात्र रुग्णाच्या नातेवाईकांना आज सकाळी सुनीता यांचा मृत्यू झाला असून, आयसीयूमध्ये फक्त उपचार देत असल्याचा दिखावा असल्याची माहिती आंबेकर यांच्या फॅमिली डॉक्टरांनी दिली. रुग्णाच्या नातेवाईकांनी खात्री केल्यानंतर संतप्त झालेल्या आंबेकर यांच्या नातेवाईकांनी मेडिकेअर आयसीयूमधील साहित्याची तोडफोड सुरू केली. पंढरपुरात अशा प्रकारे रुग्ण मयत होऊनही आयसीयूत उपचार देऊन रुग्णाच्या नातेवाईकांना लुटणाऱ्या डॉक्टरावर कठोर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली. मात्र सदर मृत महिलेवर उपचार करणाऱ्या डॉक्टर टकले यांनी शस्त्रक्रिया यशस्वी झाली होती, असं सांगत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.