शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
3
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
4
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
5
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
6
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
7
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
8
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
9
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
10
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
11
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
12
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
13
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
14
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
15
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
16
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
17
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
18
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
19
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
20
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक

मजबुतीकरण दहा वर्षे रखडले

By admin | Updated: August 10, 2016 01:04 IST

मावळ तालुक्यासह पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा होणाऱ्या पवना धरणाचे मजबुतीकरणाचे काम गेल्या 10 वर्षांपासून रखडले आहे.

पवनानगर : मावळ तालुक्यासह पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा होणाऱ्या पवना धरणाचे मजबुतीकरणाचे काम गेल्या 10 वर्षांपासून रखडले आहे. धरण उभारणीस ४१ वर्षे उलटून गेली, तरी पवना धरणग्रस्तांचे पूर्णपणे पुनर्वसन झालेले नाही. त्यामुळे धरण मजबुतीकरणास किती कालावधी लागेल, धरणाच्या सुरक्षेचे काय, टेमघर धरणासारखी गळती लागल्यानंतर किंवा धरणाच्या भिंतीला धोका निर्माण झाल्यावर लक्ष देणार का, असे असे प्रश्न उपस्थित होत आहेत.तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत पाटबंधारेच्या अनेक योजना राबविण्यात आल्या. मावळ तालुक्यातील शेती, पिण्याचे पाणी व पिंपरी-चिंचवड, औद्योगिक वसाहतीसाठी पाणी आवश्यक असल्याने पवना धरण योजना आखण्यात आली. धरणाचे बांधकाम १९६३ मध्ये सुरू होऊन १९७२ला पूर्ण झाले. धरणाची लांबी ५५७७ फूट आहे, तर उंची ११९ फूट आहे. यात मातीचा बांध ४६२७, तर दगडी सिमेंट बांधकाम ९५० फूट लांबीचे आहे. धरणात १०,७४३० दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. या धरणातील पाणीसाठा पाहता पाणीगळती होऊ नये व बंधारा सुरक्षित राहावा यासाठी मजबुतीकरणाचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी २००४ मध्ये धरणाच्या मजबुतीकरणासाठी २२ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. धरणग्रस्तांचे प्रश्न जोपर्यंत सुटत नाही. तोपर्यंत काम मार्गी लागेल, असे सध्या तरी दिसत नाही. काम पूर्ण झाल्यावर पाणीवाढ होईल व त्यातून शासनाचे उत्पन्न वाढेल. शासनाच्या धोरणानुसार हे काम २००७ पर्यंत पूर्ण होणे गरजेचे होते. मात्र, पवना धरणातून बंद जलवाहिनी नेण्याच्या अट्टहासात मजबुतीकरणाच्या कामाकडे मात्र पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. या बाबत पुणे जिल्हा कृषी उत्पादन समितीचे माजी सभापती व बंद जलवाहिनी आंदोलनाचे नेते एकनाथ टिळे यांनी सांगितले की, पिंपरी-चिंचवड महापालिकेने बंद जलवाहिनीचा हट्ट सोडून प्रथम धरणग्रस्ताच्या मुलांना महापालिकेत नोकऱ्या देण्यास प्राधान्य द्यावे. यामुळे धरणग्रस्तांची एक मागणी पूर्ण होईल व राज्य सरकारने लवकरच पुनर्वसनाचा प्रश्न सोडवून पवना धरणाचा संभाव्य धोका टाळावा. २३ जानेवारी २०१० रोजी ‘लोकमत’ने पाच वर्षांपासून रखडले पवना धरणाचे मजबुतीकरण हे वृत्त प्रसिद्ध केले होते. मात्र तत्कालीन सरकारने मजबुतीकरणाकडे कानाडोळा केला. (वार्ताहर)