शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

माळीण दुर्घटनाग्रस्तांचे पुनर्वसन रखडणार

By admin | Updated: April 23, 2015 05:03 IST

माळीण दुर्घटनेला तब्बल ९ महिने उलटूनही येथील ग्रामस्थांचा वनवास अद्याप संपला नाही. दुर्घटनाग्रस्त कुटुंबाला घरकुलासाठी ५ लाख रुपयांच्या खर्चाचा आराखडा जिल्हा

सुषमा नेहरकर, पुणेमाळीण दुर्घटनेला तब्बल ९ महिने उलटूनही येथील ग्रामस्थांचा वनवास अद्याप संपला नाही. दुर्घटनाग्रस्त कुटुंबाला घरकुलासाठी ५ लाख रुपयांच्या खर्चाचा आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयाने तयार केला आहे. मात्र, शासनाने केवळ २ लाख रुपयांनाच मान्यता दिली आहे. त्यामुळे माळीण गावचे पुनर्वसन रखडणार आहे. पावसाळ्याआधी पुनर्वसन झाले नाही तर ग्रामस्थांचे हाल होणार आहेत. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने याची चुणूक दाखविली आहे. विशेष म्हणजे माळीण दुर्घटनेनंतर मदतीचा आणि निधीचा ओघ सुरू झाला होता. अनेक संस्था आणि कंपन्यांनी मदतीची तयारीही दर्शविली आहे. मात्र, हा निधी घेण्यास अद्याप सरकारने परवानगी दिलेली नाही. या निधीमध्येही संपूर्ण गावाचे पुनर्वसन होणे शक्य आहे. सध्या दुर्घटनाग्रस्त ७९ कुटुंबांचे अडिवरे आणि कशाळवाडी येथे तात्पुरते पत्र्यांच्या शेड टाकून पुनर्वसन करण्यात आले आहे. माळीणपासून दोन कि. म.वरील आंमडे गावांत दुर्घटनाग्रस्तांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी आठ एकर जमीन संपादीत करण्यात येणार आहे. पुनर्वसनासाठी ही जागा सुरंक्षित असल्याचा अहवाल जीएसआयने दिला आहे.माळीणच्या ७९ दुर्घटनाग्रस्त कुटुंबाचे शासनाच्या वतीने पुनर्वसन करण्यात येणार आहे. प्रत्येक कुटुंबाला ४९१ चौरस फुटाचे घर बांधून देण्यात येणार आहे. घरांचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने शासनाला पाठविण्यात आला आहे. विशेष बाब म्हणून पाच लाखांच्या घरकुलाला मंजुरी द्यावी, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाने शासनाला पाठविला आहे. याशिवाय सुमारे १८ प्रकारच्या नागरी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी आदिवासी विकास विभागा मार्फत दहा कोटींचा निधी मंजुर करण्यात आला आहे. परंतु अद्याप जिल्हा प्रशासनाला हा निधी मिळालेला नसल्याचे अधिकृत सुत्रांनी सांगितले.