शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

अपघातग्रस्त मच्छिमारांचे पुनर्वसन करणार

By admin | Updated: August 24, 2016 03:12 IST

मासेमारी करतांना नुकसान झाल्यास शेतकऱ्यांप्रमाणे नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन पालकमंत्री विष्णू सवरा यांनी २३ आॅगस्ट रोजी झाई येथे केले.

अनिरुद्ध पाटील,

डहाणू/बोर्डी- समुद्रात काबाडकष्ट करणारा मच्छिमार हा शेतकरी असल्याने मासेमारी करतांना नुकसान झाल्यास शेतकऱ्यांप्रमाणे नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन पालकमंत्री विष्णू सवरा यांनी २३ आॅगस्ट रोजी झाई येथे केले. दोन दिवसांपूर्वी समुद्रात दोन बोटींना जलसमाधी मिळाल्याच्या घटनेनंतर सुखरूप परतलेल्या खलाशांच्या कुटुुंबियांना धीर देण्यासाठी खासदार चिंतामण वनगा यांच्यासह झाई येथे आले होते. या वेळी झाईतील मांगेला समाज मच्छिमार सहकारी सोसायटीच्या प्रांगणात स्थानिक मच्छिमार जमले होते. अपघातग्रस्त दोन्ही बोटींचेमालक आणि स्वबळावर किनाऱ्यापर्यंत पोहचणाऱ्या खलाशांची पालकमंत्री विष्णू सवरा आणि खासदार चिंतामण वनगा यांनी विचारपूस करून साहसाचे कौतुक केले. अशोक अंभिरे यांनी मच्छिमारांचे प्रश्न मांडले. मच्छिमारांचे पुनर्वसन, लाईफजॅकेट, बोटीत सौरदिवे, इन्व्हर्टर, मासेमारी करतांना अपघात घडल्यास दोन ऐवजी चार लाख नुकसानभरपाई आदी मागण्या मांडण्यात आल्या. शिवाय दोन्ही बोटींच्या मालकांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली. मच्छिमारांच्या विम्याची रक्कम भरण्यासह नवीन बोटींची प्रकरण करण्यास प्राधान्य देणार असल्याचे खासदार चिंतामण वनगांनी सांगितले. या दुर्घटनेची सखोल माहिती घेऊन मुख्यमंत्र्यांना दिली आहे. पीडित बोटमालक आणि खलाशांच्या रोजगार आणि पुनर्वसनाची जबाबदारी घेण्याची हमी शासनाच्या वतीने आपण घेत असल्याचे आश्वासन सवरा यांनी दिले. गुजरातने मच्छिमारांना दिलेल्या सुविधा, महाराष्ट्रातील मच्छिमारांना मिळाव्यात म्हणून प्रयत्न करणार आहे. खलाशांनी मोबाईलद्वारे संपर्क साधूनही त्यांना मदत न पुरविणाऱ्या तटरक्षक दलातील अधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडून चौकशी करणार असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी लोकमतला दिली. या वेळी जि. प. सभापती धर्मा गोवारी, डहाणू उप विभागीय दंडाधिकारी अंजली भोसले, डहाणू व तलासरी तहसिलदार, झाई सरपंच जनी सांबर, पंचायत समिति सदस्य प्रकाश सांबर, मिच्छमार नेते नरेंद्र पाटील, राजेंद्र मेहेर आणि स्थानिक मच्छिमार मोठ्यासंख्येने उपस्थित होते.