शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
19
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
20
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच

कर्जमाफी देण्यास नकार

By admin | Updated: March 17, 2017 04:09 IST

शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी ३० हजार ५०० कोटींची गरज असून ती दिल्यास राज्याकडे कृषी व अन्य क्षेत्रांतील गुंतवणूक आणि विकासकामांसाठी पैसाच राहणार नाही

मुंबई : शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी ३० हजार ५०० कोटींची गरज असून ती दिल्यास राज्याकडे कृषी व अन्य क्षेत्रांतील गुंतवणूक आणि विकासकामांसाठी पैसाच राहणार नाही, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नसल्याचे स्पष्ट केले. आधी कर्जमाफी करूनही पाच वर्षांत १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे आत्महत्या रोखण्यासाठी कर्जमाफी उपाय नाही, असे ते म्हणाले. आपण कर्जमाफीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करू, असेही ते म्हणाले. कर्जमाफीनंतर शेतकरी आत्महत्या थांबतील याची हमी तुम्ही देता का, असा सवाल त्यांनी विरोधकांना केला. निवडणुकीतील पराभवामुळे विरोधक कर्जमाफीचे राजकारण करीत आहेत, त्यांना बँक घोटाळे लपवायचे आहेत, अशी टीका करून ते म्हणाले की, गेल्या वेळीही केंद्रानेच कर्जमाफी दिली होती. याही वेळी ती द्यावी यासाठी आपण शिष्टमंडळासह केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करू. कर्जमाफीनंतर पाच वर्षांत १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्यामुळे कर्जमाफी करून आत्महत्या होणार नाहीत याची हमी विरोधक देणार का?- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्रीअवकाळी पाऊस, गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसानमराठवाड्यासह विदर्भ व सोलापुरात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. एकीकडे नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झालेले असताना सरकार कर्जमाफीबाबत चकार शब्द काढत नाही. अद्याप कर्जाचे पुनर्गठण करण्यात आले नाही, नवीन कर्ज नाही त्यामुळे शेतकरीवर्ग समूळ नष्ट व्हावा असे सरकारचे धोरण असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. मगरमच्छ के आंसू : १५ वर्षांत शेतकऱ्यांसाठी काहीही न केलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीला कर्जमाफी मागण्याचा अधिकारच नाही. त्यांचे ‘मगरमच्छ के आंसू’ आहेत. कर्जमाफीच्या मागणीचा अधिकार भाजपा-शिवसेनेला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.शेतकऱ्यांची फसवणूकविरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मात्र राज्य सरकारने शेतकऱ्यांची घोर फसवणूक केल्याचा आरोप केला. गदारोळामुळे सभागृहाचे गुरुवारीही कामकाज चार वेळा तहकूब झाले आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित झाले.कोंडी कायम : शेतकरी कर्जमाफीवरून विधान परिषदेतील कोंडी अद्याप मात्र कायमच आहे. एकीकडे सरकार चर्चा व बैठकांचा मार्ग सांगत आहे, तर विरोधक मात्र ताबडतोब कर्जमाफी जाहीर करण्याच्या मागणीवर अडून बसल्याने आजही सभागृह तहकूब करावे लागले. शिवसेना सदस्य शांतमुख्यमंत्री बोलत असताना आणि नंतरही समाधान न झालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी गोंधळ घातला. मात्र, शिवसेनेच्या सदस्यांनी मुख्यमंत्र्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले.कर्जमाफीसाठी केंद्राला साकडे घालण्याचे त्यांनी मान्य केले आहे. एक-दोन दिवसांत तशी कृती करावी व अर्थसंकल्पात कर्जमाफीचा समावेश करावा, असे शिवसेनेचे अनिल कदम म्हणाले. मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करून ते म्हणाले की, काँग्रेस-राष्ट्रवादीला गेली १५ वर्षे काहीही करता आले नाही म्हणून त्यांना विरोधात बसावे लागले आहे. उद्धव ठाकरे यांची भूमिका ही कर्जमाफीचीच असून, ती न झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरू.