शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

उजनीत पाणी सोडण्याबाबत फेरविचार करावा

By admin | Updated: November 11, 2015 02:50 IST

उजनी धरणात ६७ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे, तसेच सोलापूर जिल्ह्णात तीव्र पाणीटंचाई नाही. अशावेळी पुणे जिल्ह्णातील भामा आसखेड, चासकमान, आंद्रा आणि मुळशी धरणांतून

पुणे : उजनी धरणात ६७ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे, तसेच सोलापूर जिल्ह्णात तीव्र पाणीटंचाई नाही. अशावेळी पुणे जिल्ह्णातील भामा आसखेड, चासकमान, आंद्रा आणि मुळशी धरणांतून १० टीएमसी पाणी सोडल्यास कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शासनाने यासंदर्भात फेरविचार करावा, असे पत्र जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी जलसंपदा विभागाच्या सचिवांना दिले आहे.१८ नोव्हेंबरपूर्वी पोलीस बंदोबस्ताअभावी कोणत्याही परिस्थितीत पाणी सोडता येणार नाही, असेही त्यांनी पत्रात कळविले आहे. जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने पुणे विभागातील चासकमान धरणातून ३ टीएमसी, भामा आसखेडमधून ४, आंद्रा २ आणि मुळशी धरणातून १ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय दिला आहे. सध्या उजनी धरणामध्ये ५३ टीएमसी मृत साठा व १३ टीएमसी उपयुक्त साठा असे एकूण ६७ टीएमसी पाणी शिल्लक आहे. भामा आसखेड, चासकमान, आंद्र्रा आणि मुळशी धरणांत मिळून केवळ ४३ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे या धरणांतून १० टीएमसी पाणी सोडल्यास ३० ते ४० टक्के पाणीसाठा कमी होणार आहे. याचा जिल्ह्णातील पिण्याचे पाणी व शेतीवर मोठा परिणाम होईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रात म्हटले आहे. उजनीत पाणी सोडण्यास खेड, शिरुर, आंबेगाव, मुळशी तालुक्यातून मोठा विरोध आहे. शिरुरचे आमदार बाबुराव पाचर्णे यांनी प्राधिकरणाच्या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याबाबत अद्याप निर्णय झालेल्या नसल्याने पाणी सोडण्यात येऊ नये, अशी मागणी पाचर्णे यांनी केली, तर खेडचे आमदार सुरेश गोरे यांनीही धरणातून पाणी सोडण्यास विरोध केला आहे. चासकमानमधून ३ टीएमसी पाणी सोडल्यास केवळ ३ टीएमसी पाणी शिल्लक राहील. त्यामुळे उन्हाळी दोन आवर्तने देता येणार नाहीत. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी हे पत्र पाठविले आहे.