शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

भारतात नवनिर्मितीची कमतरता - जावडेकर

By admin | Updated: January 5, 2015 06:36 IST

आपल्याकडील शिक्षण व्यवस्थेमुळे भारतात नवनिर्मितीची कमतरता असून, यासंदर्भातील संस्कृती रुजवणे गरजेचे आहे, असे मत केंद्रीय पर्यावरण,

मुंबई : आपल्याकडील शिक्षण व्यवस्थेमुळे भारतात नवनिर्मितीची कमतरता असून, यासंदर्भातील संस्कृती रुजवणे गरजेचे आहे, असे मत केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामानबदलमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले. मुंबईत आयोजित १०२व्या भारतीय विज्ञान परिषदेतील ‘संस्कृतच्या माध्यमातून प्राचीन भारतीय विज्ञान’ या चर्चासत्रात प्रकाश जावडेकर रविवारी बोलत होते.प्रकाश जावडेकर म्हणाले, कुठलेही पुरेसे साधन, यंत्र नसताना केवळ सूक्ष्म निरीक्षण, वैचारिकता, अनुभव, बुद्धिमत्ता आणि तर्कशास्त्र यांच्या आधारावर प्राचीन भारतीय विज्ञानाने जे साध्य केले त्या ज्ञानाची दखल घेऊन त्याच्या संदर्भाचा उपयोग केला गेला पाहिजे. जर्मनीसारखा देश जर आपली संस्कृत भाषा आणि प्राचीन भारतीय विज्ञानाच्या आधारावर नवी उपकरणे, नवे विज्ञान विकसित करीत असेल तर आपण का करू नये, असा सवाल जावडेकर यांनी या वेळी केला. प्रत्येक जुनी गोष्ट जशी सोने नसते तशीच प्रत्येक जुनी गोष्ट टाकाऊसुद्धा नसते, असे त्यांनी नमूद केले. देशातील युवा वर्गात क्षमता आहे, उत्साह आहे, काहीतरी करून दाखविण्याची धमक आहे; याच आधारावर विज्ञानाचा आणि पर्यायाने समाजाचा विकास होतो, असे त्यांनी नमूद केले. कार्यालयात किती वेळ काम केले यावरून वैज्ञानिक छोटा किंवा मोठा नसतो तर त्याच्यातील उपजत बुद्धिमत्तेच्या जोरावर तो मोठा होत असतो आणि तेव्हाच विज्ञानाचा विकास होतो. निसर्गाच्या नियमाबद्दल सांगताना जावडेकर म्हणाले की, ज्ञान ही प्रगतीशील प्रक्रिया असून, सर्व मुद्द्यांवर चर्चा होणे अपेक्षित आहे, त्या विचारात घेणे आवश्यक आहे, त्यानंतर यातील चांगल्या गोष्टी कायम राहतील तर चुकीच्या गोष्टी नष्ट होतील.दरम्यान, या चर्चासत्राला भारतीय विज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्रा. निमसे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजन वेळूकर, संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उमा वैद्य, मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभागाच्या प्रमुख गौरी माहुलीकर आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ विजय भटकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)