शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

वाढीनंतर पुन्हा घटले इंधन दर

By admin | Updated: October 4, 2015 03:26 IST

राज्य सरकारने पेट्रोल-डिझेल एलबीटी मुक्त केले. याची घोषणा ३० सप्टेंबर रोजी करण्यात आली. मात्र, याचा जीआर (शासकीय आदेश) काढण्यात सरकारने एक दिवसाचा विलंब केल्यामुळे

नागपूर : राज्य सरकारने पेट्रोल-डिझेल एलबीटी मुक्त केले. याची घोषणा ३० सप्टेंबर रोजी करण्यात आली. मात्र, याचा जीआर (शासकीय आदेश) काढण्यात सरकारने एक दिवसाचा विलंब केल्यामुळे ग्राहकांना मिळणारी कोट्यवधी रुपयांची सूट सरकारी तिजोरीत जमा झाली. ग्राहकांनी पेट्रोल पंपांवर खरेदी केलेल्या पेट्रोल-डिझेलचे बिल याचे साक्षीदार आहेत. या प्रकारणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला असता लोकमतला असे आढळून आले की, राज्य सरकार ३० सप्टेंबर रोजी पेट्रोल-डिझेलवरील एलबीटी हटविला, मात्र या संबंधीचा जीआर १ आॅक्टोबरच्या सायंकाळी जारी केला. त्यामुळे १ व २ आॅक्टोबर दरम्यानच्या रात्री १२ वाजतापासून पेट्रोल-डिझेलचे नवे दर लागू झाले. राज्य सरकारने एलबीटी हटविण्याच्या निर्णयाचा जीआर जारी करण्यात तत्परता दाखविली नाही. मात्र, दुष्काळग्रस्तांच्या नावावर पेट्रोल-डिझेलवर लादण्यात आलेल्या सरचार्जची अंमलबजावणी करणारे परिपत्रक त्वरित जारी केले. याचा असा परिणाम झाला की, ३० सप्टेंबर रोजी ज्या ग्राहकांनी कमी दरात पेट्रोल-डिझेल खरेदी केले होते, त्यांना १ आॅक्टोबर रोजी एलबीटी व सरचार्ज सोबत पेट्रोल-डिझेल खरेदी करावे लागले. याचा कोणत्याही ग्राहकावर व्यक्तिगत भुर्दंड पडला नसला तरी राज्यभरातील ग्राहकांचा विचार करता सरकारने या ग्राहकांकडून कोट्यवधी रुपयांची वसुली करून आपली तिजोरी भरली आहे. १ आॅक्टोबर रोजी एलबीटी हटविण्याचा जीआर जारी केल्यानंतर मध्यरात्रीपासून शहरात पुन्हा स्वस्त झाले, असे विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष हरविंदरसिंह भाटिया यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. डिझेलवर तीन टक्के दराने व्हॅट वसुली केली जात असल्यामुळे डिझेलच्या दरात नाममात्र वाढ झाल्याचे दिसत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.