शहरं
Join us  
Trending Stories
1
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
2
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
3
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
4
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
5
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
6
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
7
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
8
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
9
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
10
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
11
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
12
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
13
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
14
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
15
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
16
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
17
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
18
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
19
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
20
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!

पाण्याचा पुनर्वापर; बचतीची आवश्यकता

By admin | Updated: July 13, 2014 22:30 IST

लोकमत इनिशिएटिव्ह; थेंब महत्त्वाचा उज्ज्वल भविष्यासाठी

वाशिम : एकेकाळी पाण्यासाठी समृद्ध शहर असलेल्या वाशिमवर आता आठ दिवसाआड पाणी पुरवठय़ाची नामुष्की ओढविली आहे. धरणांतील पाणीसाठा जपून वापरण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. सढळ हाताने पाणी वापरण्याची सवय आता सोडण्याची गरज आहे. शहरातील काही नागरिकांनी पाण्याच्या बचतीचा वेगळा आदर्श निर्माण केला आहे, यातून उर्वरित शहरवासीयांना प्रेरणा घेण्याची गरज आहे. पाण्याचा पुनर्वापर, रेनवॉटर हार्वेस्टिंगसाठी पुढे येण्याची हीच वेळ आहे. वाशिम शहरातील काही नागरिकांनी पाण्याच्या पुनर्वापराचे प्रकल्प उभारले आहेत. सांडपाण्याचा यातून पुरेपूर वापर होत असुन पाण्याची बचत होण्यासही मदत होत आहे. साधारण दर तीन वर्षांनंतर वाशिमवर पाणी कपातीची आपत्ती ओढवते. या वेळी पाणी बचतीबाबत चर्चा होते. विविध उपाय सुचविले जातात. मात्र, पाऊस सुरू झाला, की सगळे मनसुबे वाहून जातात. आता मात्र आपण धडा घेण्याची वेळ आली आहे. वाशिम वाढतंय, लोकसंख्या वाढतीय. मात्र, वाशिमसाठीची पाणीसाठवण क्षमता मात्र वाढणार नाही. उपलब्ध पाणीच आपल्याला पुरवून वापरावे लागणार आहे, त्यामुळे आतापासूनच सुरुवात करावी लागणार आहे. स्थानिक नगर पालिकेकडून उपाययोजना होतील म्हणून गप्प बसून चालणार नाही. वैयक्तिक पातळीवरही आपण पाणीबचतीसाठी काळजी घ्यायला हवी. ** सामूहिक जबाबदारी - सार्वजनिक ठिकाणी असलेल्या नळकोंडाळ्यांची तातडीने दुरुस्ती करा- येत्या पावसाळ्य़ात छतावर पडणार्‍या पाण्याचे संकलन करून त्याचे पुनर्भरण करण्यासाठी पुढाकार घ्या- जुने जलस्रोत व कूपनलिकांचे पुनरुज्जीवन आवश्यक आहे. - नैसर्गिक जलस्रोत व टेकड्यांवरील अतिक्रमण रोखा. वृक्षारोपण करून पुण्याची पुन्हा 'ग्रीन सिटी' ही ओळख निर्माण करावी. ** वैयक्तिक जबाबदारी - नागरिकांनी कपडे व भांडी धुताना पाण्याचा कमीत कमी वापर करावा. - आंघोळ व दाढी करताना आवश्यक तेवढचे पाणी घ्यावे. - नळाच्या पाण्याने गाडी धुण्यापेक्षा बादलीत पाणी घेऊन ओल्या फडक्याने गाडी पुसावी. - उद्यानासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर न करता पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याचा उपयोग करावा.** वाशिमवासीयांनो लक्षात ठेवा..खरे तर आपण पाण्याशी नीट वागत नाही. अर्मयाद वाढणारी लोकसंख्या आणि पाण्याच्या बेबंद वापराची सवय यामुळे पाण्याची टंचाई सर्वांनाच जाणवू लागली आहे. त्यात पावसाने ओढ दिल्याने वाशिमवासीयांवर आता पाणी बचत करण्याची सक्ती करण्याची वेळ आली आहे. पुणेकरांना आपल्या सवयी बदलाव्या लागणार आहेत. या सवयी बदलण्यासाठी छोटे-छोटे उपाय आपण करू शकतो. - आंघोळ बादलीत पाणी घेऊन केल्यास : १८ लिटर शॉवरखाली : १00 लिटर- दाढी नळ सोडून दाढी केल्यास : १0 लिटर मग घेऊन : १ लिटर- ब्रश नळ सोडून केल्यास : १0 लिटर मग घेऊन : १ लिटर - कपडे नळाखाली :११६ लि. बादलीचा वापर केल्यास : ३६ लिटर - मोटार पाईप वापरल्यास : १00 लि. बादलीचा वापर केल्यास : १८ लिटर- हात धुण्यासाठी नळाखाली : १0 लिटर मग घेऊन : अर्धा लिटर - शौचविधी फ्लश केल्यास : २0 लिटर बादलीचा वापर केल्यास : ६ लिटर** नैसर्गिक साधनसंपत्तीचे आपण विश्‍वस्त असल्याचे भान ठेवून काही व्यक्ती, संस्था, गृहनिर्माण सोसायटी यांनी यापूर्वीपासूनच पाणी बचतीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यामध्ये छतावरील पाण्याचे संकलन, पुनर्भरण व पुनर्वापरासाठीचे प्रयोग यशस्वीपणे राबविले आहेत. त्यांच्या कामातून अनेकांना प्रेरणा मिळेल. ह्यलोकमतह्णच्या माध्यमातून त्यांचे कार्य समाजासमोर आणून त्याला बळ देण्याचा आमचा मानस आहे. ** आपल्या उपक्रमाची/प्रयोगाची माहिती ह्यलोकमतह्ण कार्यालयात पाठवा. पत्ता : वाशिम अर्बन बँकेसमोर, रविावार बाजार मार्ग, वाशिम ४४४५0५, फोन (0७२५२) २३४३६८ (ई-मेल : lokmat1234@gmail.com- निवासी संपादक