शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात आणखी ६० हजार पोलिसांची भरती

By admin | Updated: May 5, 2015 01:16 IST

वाकोला पोलीस स्थानकात घडलेल्या प्रकरणामुळे, पोलिसांवर कामाचा ताण आहे, असा सूर उमटला आहे. राज्यात २ लाख ४९ हजार पोलीस आहे.

नागपूर : वाकोला पोलीस स्थानकात घडलेल्या प्रकरणामुळे, पोलिसांवर कामाचा ताण आहे, असा सूर उमटला आहे. राज्यात २ लाख ४९ हजार पोलीस आहे. हे लक्षात घेता पोलिसांवर कामाचा ताण नाही. पण तसे असल्यास आॅक्टोबर महिन्यापासून नवीन पोलिसांची भरती करण्यात येणार आहे. जवळपास ६० हजार पोलिसांची कुमक राज्याच्या सुरक्षेत तैनात होणार आहे, अशी माहिती गृह राज्यमंत्री राम शिंदे यांनी दिली. या घटनेतील तथ्य शोधण्यासाठी सखोल चौकशी होईल, चौकशीत निष्पन्न होणाऱ्या तथ्यानुसार कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले. राम शिंदे सोमवारी गडचिरोलीच्या दौऱ्यावर आले होते. दौरा आटोपल्यानंतर ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते. गडचिरोलीत त्यांनी शहीद पोलिसांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांना मदतीचे आश्वासन दिले. शिवाय शौर्य पदकासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविणार असल्याचेही ते म्हणाले. २००५ च्या पूर्वी नक्षलवाद्यांशी लढताना वीर मरण आलेल्या ९६ पोलिसांना शहिदांचा दर्जा देऊ. १० वर्ष त्याबद्दलचे प्रस्ताव प्रलंबित होते असेही राम शिंदे म्हणाले. गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा धाक व कायद्याचा वचक राहिलेला नाही. शिक्षचे प्रमाण वाढण्यासाठी न्यायाधिशांच्या नियुक्त्या, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सक्ती, पोलिसांची गुणवत्ता वाढविण्यासाठी वेतनवाढ, त्यांचा निवासाचा प्रश्न सोडविण्यावरही सरकारचा भर आहे. कारागृहातील कैदी मोबाइलवर संभाषण करतात. हे थांबविण्यासाठी अत्याधुनिक दर्जाचे जॅमर लावण्यात येणार असल्याचे, ते म्हणाले.