शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

अग्निशमन जवानांना भरपाईचा पुनर्विचार करा

By admin | Updated: August 2, 2016 05:56 IST

मृत्युमुखी किंवा जखमी अग्निशमन दलाच्या जवानांना व त्यांच्या कुटुंबीयांना नोकरी देण्याबाबत असलेल्या धोरणाचा पुनर्विचार करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने महापालिकेला दिले.

मुंबई : कर्तव्यावर असताना मृत्युमुखी पडलेल्या किंवा जखमी झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांना किंवा त्यांच्या कुुटुंबीयांना देण्यात येणाऱ्या भरपाईच्या रकमेबाबत तसेच त्यांच्या कुटुंबीयांना नोकरी देण्याबाबत असलेल्या धोरणाचा पुनर्विचार करा, असे निर्देश सोमवारी उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिले.महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवन सुरक्षा कायदा, २००६ व त्यातील तरतुदींचे काटेकोरपणे पालन करण्याचा आदेश राज्य सरकार व मुंबई महापालिकेला द्यावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका डॉ. शर्मिला घुगे यांनी उच्च न्यायालयात केली आहे.संबंधित कायद्याचे पालन करताच मुंबईत गगनचुंबी इमारती उभारण्यात येत आहे. महापालिकांचा यावर अंकुश नाही. कायद्याचे पालन न केल्यास मोठी जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे गगनचुंबी इमारतींत राहणाऱ्यांवर व मालकांवर नियमांचे पालन न केल्याबद्दल कारवाई करण्याचा आदेश संबंधित प्रशासनाला द्या, अशी विनंती डॉ. घुगे यांनी जनहित याचिकेद्वारे केली आहे.गेल्या सुनावणीवेळी उच्च न्यायालयाने कर्तव्यावर असताना शहीद झालेल्या जवानांसाठी महापालिकेकडे काय धोरण आहे? अशी विचारणा महापालिकेकडे केली होती.सोमवारी यासंदर्भात सुनावणी झाली. त्यात महापालिकेने न्या. अभय ओक व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठापुढे प्रतिज्ञापत्र सादर केले. ‘कर्तव्यावर असताना शहीद झालेल्या जवानांना किमान १० लाख रुपये तर कमाल १८ लाख रुपये देण्यात येतात. मात्र मृत्युमुखी पडलेल्या जवानाच्या कुटुंबीयांतील एकाला नोकरी देण्याची तरतूद २००९च्या धोरणात नाही,’ असे महापालिकेने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.‘भरपाईत वाढ करण्याची आवश्यकता आहे. शहिदांच्या कुटुंबीयांतील एका सदस्याला नोकरी देण्याची तरतूद असली पाहिजे,’ असे म्हणत उच्च न्यायालयाने महापालिकेला या धोरणाबाबत पुनर्विचार करण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी) >रकमेत वाढ करण्याची आवश्यकता!‘२००९च्या धोरणावर पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे. जवानांना नुकसानभरपाई म्हणून देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करण्याची आवश्यकता आहे. तसेच शहीद झालेल्या जवानाच्या कुटुंबीयातील एका सदस्याला नोकरी देण्याची तरतूद धोरणात असली पाहिजे,’ असे म्हणत उच्च न्यायालयाने महापालिकेला या धोरणाबाबत पुनर्विचार करण्याचे निर्देश दिले.