शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
4
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
5
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
6
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
7
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
8
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
9
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
10
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
11
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
12
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
14
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
15
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
16
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
17
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
18
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
19
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
20
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
Daily Top 2Weekly Top 5

पाली प्रवेशद्वारावरील कमान पुन्हा बांधा

By admin | Updated: October 8, 2016 02:20 IST

अनेक गावांमध्ये ही सीमा दर्शविण्यासाठी व शोभा वाढविण्यासाठी उंच आणि भव्य प्रवेशद्वार तयार केले जाते.

पाली : प्रत्येक गावाची एक सीमारेषा ठरलेली असते. अनेक गावांमध्ये ही सीमा दर्शविण्यासाठी व शोभा वाढविण्यासाठी उंच आणि भव्य प्रवेशद्वार तयार केले जाते. पाली गावच्या सीमेवर देखील अशाच प्रकारची भव्य दगडी कमान पाच दशकांपूर्वी उभारण्यात आली होती. परंतु आता फक्त त्याचे भग्न अवशेषच शिल्लक राहिले आहेत. तेव्हा ही कमान पुन्हा बांधण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.बल्लाळेश्वराचे स्थान म्हणून पाली गाव सर्वत्र प्रसिद्ध आहे. या गावच्या सीमेवर पाली-खोपोली रस्त्यावर उंबरवाडीनजीक १९६५-६७ मध्ये रायगड जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष दादासाहेब लिमये यांनी पुढाकार घेऊन प्रवेशव्दारावर भव्य दगडी नक्षीकाम के लेली कमान उभारली होते. त्यानंतर कित्येक वर्षे ही कमान पालीची शान राखत रु बाबात उभी होती. परंतु नागोठणे येथे जेव्हा आयपीसीएल (सध्याची रिलायन्स) कंपनीची उभारणी सुरू झाली तेव्हा यासाठी लागणारी साधने, यंत्रे ही मुंबई-पुणे मार्गे पालीवरून नेण्यात येऊ लागली. परिणामी या अजस्त्र वाहनांस या कमानीखालून जाता येत नव्हते. त्यामुळे नाइलाजास्तव ही कमान तोडावी लागली. सध्या याच्या उरलेल्या भागावर झाडे उगवली आहेत. त्यामुळे पालीच्या शिरपेचातील एक मोती निखळला. त्यानंतर ही कमान पुन्हा उभी करण्याचे स्वारस्य कोणीच दाखविले नाही. परिणामी आज ही कमान भग्नावस्थेत तशीच उभी आहे. ही कमान पुन्हा उभारण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)>शिक्षणमहर्षी दादासाहेब लिमये १९६५-६७ ला जिल्हा परिषद अध्यक्ष असताना शासकीय खर्चाने ही कमान उभारण्यात आली होती. पाली हे अष्टविनायक क्षेत्र आहे. रोज असंख्य भाविक येथे येत असतात. इतर गावांमध्ये जसे प्रवेशद्वार त्या गावची शोभा वाढवित असते, त्याचप्रमाणे पाली गावासाठी पुन्हा भव्य प्रवेशद्वार उभारण्यात यावे. - रवींद्रनाथ ओव्हाळ, सामाजिक कार्यकर्ते, पाली