शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

विद्रोही एकजूट भगव्या विचारांना पराभूत करणार!

By admin | Updated: December 14, 2014 01:51 IST

भगव्या विचारांना विद्रोही एकजूट पराभूत करेल, असे प्रतिपादन 12व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा प्रा.डॉ. रूपा बोधी-कुलकर्णी यांनी केले.

बीड : देशातील स्त्रिया, बहुजन व कष्टकरी या तीन घटकांसाठी भगवी राजवट धोकादायक असून, भगव्या विचारांना विद्रोही एकजूट पराभूत करेल, असे प्रतिपादन 12व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा  प्रा.डॉ. रूपा बोधी-कुलकर्णी यांनी केले.  दोन दिवस चालणा:या या संमेलनाचे उद्घाटन येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात  शनिवारी बेंगलोर येथील साहित्यिक चंद्रशेखर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या परिसराला क्रांतीसिंह नाना पाटील नगरी असे नाव देण्यात आले आहे. दरम्यान, सकाळी शहरातून शोभायात्रही काढण्यात आली.
या वेळी व्यासपीठावर  स्वागताध्यक्ष हनुमंत उपरे, वाहरू सोनवणो, संदेश भंडारे, डॉ. बाबुराव गुरव, गौतम कांबळे, कॉ. नामदेव चव्हाण, एकनाथ आव्हाड यांची उपस्थिती होती. दरम्यान, कार्यक्रमाचे उद्घाटन मशाल पेटवून अनोख्या पद्धतीने करण्यात आले. पुढे बोलताना प्रा.डॉ. बोधी म्हणाल्या, सध्याच्या काळात स्त्री अत्याचार वाढले आहेत, जातीय भेदभाव सुरूच आहेत.  कष्टकरी वर्गासमोर सत्ता परिवर्तन झाले तरी समस्यांचा डोंगर जशास तसा आहे. या तिन्ही घटकांतील लोकांचे संरक्षण धोक्यात आले आहे. या वेळी बोलताना त्यांनी भाजपा सरकार व राष्ट्रीय स्वयंसंघावर त्यांनी टीका केली. या वेळी स्वागताध्यक्ष हनुमंत उपरे, कॉ. नामदेव चव्हाण यांच्यासह इतर मान्यवरांची भाषणो झाली. संमेलनासाठी सातारा, सांगली, धुळे, औरंगाबाद, नांदेड, परभणी यांसह इतर जिल्ह्यांतून साहित्यिकांची उपस्थिती होतीे. (प्रतिनिधी)