शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पाच्या स्वागतासाठी आसमंत सज्ज

By admin | Updated: September 5, 2016 02:31 IST

गणेशोत्सवासाठी अवघा आसमंत सज्ज झाला असून शहरातील बाजारपेठा गर्दीने फुलून गेल्या आहेत.

नवी मुंबई : गणेशोत्सवासाठी अवघा आसमंत सज्ज झाला असून शहरातील बाजारपेठा गर्दीने फुलून गेल्या आहेत. बहुतांश मंडळांची गणेश देखाव्यांची सजावट पूर्ण झाली आहे. घरगुती गणपतीसाठी लागणाऱ्या फुलांच्या माळा, बाप्पाचे दागिने, वस्त्र, गणेश स्थापनेकरिता लागणारे पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी भाविकांनी बाजारपेठांमध्ये गर्दी केली आहे.बाप्पाच्या स्वागताची जंगी तयारी सुरू असून ढोल-ताशा पथकांना पसंती देण्यात येत आहे. शहरातील मोठमोठ्या गणेशोत्सव मंडळांनी रविवारी मूर्ती आणल्या आहेत. पनवेल परिसरात लेझीम, झांज, झेंडा पथक प्रात्यक्षिक सादर करणार आहेत. गणेश मंदिरांमध्येही रोषणाई करण्यात आली असून संपूर्ण शहर बाप्पामय झाले आहे. जुईनगरमधील स्वयंभू गणेश मंदिर फुलांनी सजविण्यात आले असून गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सीबीडीचा राजा मंडळाच्या वतीने महिला तसेच मुलांसाठी विविध उपक्रम, स्पर्धा राबविल्या जाणार आहेत. भाविकांच्या सुरक्षेसाठी गणेश मंडळांनी सीसीटीव्ही बसविले आहे, तसेच गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी मंडळाचे स्वयंसेवक कार्यरत आहेत. (प्रतिनिधी)>गणेशोत्सवात घ्यावयाची काळजीसार्वजनिक गणेशोत्सवात असंख्य भाविक दर्शनासाठी व पाहण्यासाठी गर्दी करतात. अशा गर्दीच्या ठिकाणी तेथील वीजवहन यंत्रणा योग्य आणि अपघातविरहित असणे आवश्यक आहे. मंडप, स्टेज व इतर साहित्य महावितरणच्या विद्युत यंत्रणेपासून सुरक्षित अंतरावर असल्याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. गणेशोत्सवातील मंडप किंवा रोषणाई, देखाव्यांसाठी लागणारी वीजव्यवस्था ही अधिकृत वीज कंत्राटदारांकडूनच करून घेणे गरजेचे आहे. गणेशोत्सवात विविध कामांसाठी करण्यात येणारी वायरिंग ही योग्य तसेच दोषविरहित असावी. गर्दीच्या ठिकाणी विजेचे वायर्स विस्कळीत स्वरूपात राहणार नाहीत, याची पुरेपूर काळजी घेतली पाहिजे.मिरवणुकीदरम्यान आजूबाजूला असलेल्या उच्च व लघुदाब वाहिन्या, फिडर पिलर, रोहित्रे आदींपासून मिरवणुकीतील वाहने, देखावे सुरक्षित अंतरावर राहतील, याची काळजी प्रत्येक मंडळाने घ्यावी.>महावितरणकडून कमी दरात वीज उपलब्धसार्वजनिक उत्सवांसाठी तात्पुरती वीजजोडणी प्रतियुनिट ३ रु पये ७१ पैसे अधिक इंधन अधिभार असे वीजदर ठेवण्यात आल्याची माहिती महावितरण विभागाने दिली आहे. घरगुती दरांपेक्षा हे दर कमी असून सार्वजनिक मंडळांना याचा लाभ घेता येणार आहे. आयोजकांनी सार्वजनिक सुरक्षेला महत्त्व द्यावे, कमी दर ठेवण्यामागे हाच मुख्य हेतू असल्याचे महावितरण विभागाने स्पष्ट केले आहे. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अधिकृत वीजपुरवठा घेण्यास सार्वजनिक मंडळांनी प्राधान्य द्यावे, असेही आवाहन यावेळी करण्यात आले आहे.गणेशोत्सवाच्या काळात वीजतारा जळणे, शॉर्टसर्किट होणे किंवा वीजव्यवस्थेत बिघाड होणे आदी घटनांची संभाव्य शक्यता लक्षात घेऊन तातडीच्या मदतीसाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना २४ तास सुरू असणाऱ्या १९१२, १८००-२००-३४३५, १८००-२३३-३४३५ या टोल फ्री क्र मांकावर संपर्क साधता येणार आहे.