शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

गैरव्यवहारांबाबत आरबीआय अनभिज्ञ !

By admin | Updated: January 17, 2017 06:18 IST

नेमकी किती व कशाप्रकारे अनियमितता, गैरव्यवहार झाला, याबाबत रिझर्व्ह बॅँकेकडे कसलीही ठोस माहिती उपलब्ध नाही.

मुंबई : नोटाबंदीच्या निर्णयानंतर राज्य व जिल्हा सहकारी बँकांना नोटा बदलण्याच्या व्यवहारावर बंदी घातली तरी त्या ठिकाणी नेमकी किती व कशाप्रकारे अनियमितता, गैरव्यवहार झाला, याबाबत रिझर्व्ह बॅँकेकडे कसलीही ठोस माहिती उपलब्ध नाही. त्याबाबत आपण अनभिज्ञ असल्याची कबुली दस्तुरखुद्द आरबीआयने माहिती अधिकार कायद्यान्वये केलेल्या अर्जाच्या उत्तरात दिली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी उपलब्ध केलेल्या माहितीतून ही बाब उघड झाली आहे. त्यामुळे सहकारी बॅँकेतील गैरव्यवहाराबाबत कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नसताना त्यावर केंद्र सरकारने निर्बंध का घातले, त्यामागचा नेमका हेतू काय होता, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या बंदीचा मोठा फटका शेतकरी व ग्रामीण भागातील व्यवहारावर झाला होता. गेल्या वर्षी ८ नोव्हेंबरला ५०० व एक हजार रुपये चलनाच्या नोटांवर बंदी घातल्यानंतर १४ नोव्हेंबरला केंद्राने राज्य व जिल्हा सहकारी बॅँकेत जुन्या व नव्या नोटांची देवाण-घेवाण करण्यास बंदी घातली. या बँकांमध्ये ठरावीक लोकांना हव्या तितक्या प्रमाणात नवीन नोटा पुरविल्या जात असून नोटा बदलण्याच्या व्यवहारात मोठा गैरव्यवहार केला जात असल्याचे कारण त्यासाठी देण्यात आले होते. त्यामुळे गलगली यांनी ८ नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०१६ या कालावधीत राज्य व जिल्हा सहकारी बँकेमध्ये नवीन नोटांच्या देवाण-घेवाणीच्या व्यवहारात अनियमितता, गैरव्यवहार झाला, त्याबाबत संबंधित बँकेवर कोणती कारवाई करण्यात आली, याची तपशीलवार माहिती विचारली होती. त्याबाबत आरबीआयने त्यांना राज्य व जिल्हा सहकारी बँकांमध्ये झालेल्या गैरव्यवहाराची माहिती उपलब्ध नाही. शहरी सहकारी बँकांमध्ये झालेल्या गैरव्यवहाराबाबत अन्य विभागांकडून माहिती उपलब्ध करून दिली जाईल, असे कळविले आहे. सहकारी बँकांवरील निर्बंधांमुळे शेतकरी, मध्यमवर्गीय नागरिकांना मोठा फटका बसला आहे, त्यांची मोठी गैरसोय झाली आहे. जर या बँकांतील गैरव्यवहाराबाबत काहीही माहिती नसताना हा निर्णय का घेण्यात आला, असा सवाल गलगली यांनी उपस्थित केला आहे. (प्रतिनिधी)नव्या नोटा पुरविल्या८ नोव्हेंबरला नोटांवर बंदी घातल्यानंतर १४ नोव्हेंबरला केंद्राने राज्य व जिल्हा सहकारी बँकांमध्ये ठरावीक लोकांना हव्या तितक्या प्रमाणात नवीन नोटा पुरविल्या जात असून नोटा बदलण्याच्या व्यवहारात मोठा गैरव्यवहार केला जात असल्याचे कारण त्यासाठी देण्यात आले होते.