शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
6
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
7
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
8
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
9
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
10
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
11
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
12
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
13
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
14
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
15
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
17
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
18
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
19
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
20
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?

साडेपाच हजार कोटींचा घोटाळा परभणीच्या रत्नाकर गुट्टेने केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2018 05:55 IST

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील गंगाखेड शुगर्सचे चेअरमन रत्नाकर गुट्टे यांनी बोगस कंपन्यांच्या माध्यमातून २७ हजार शेतकऱ्यांना व बँकांना गंडवून साडेपाच हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.

नागपूर : परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील गंगाखेड शुगर्सचे चेअरमन रत्नाकर गुट्टे यांनी बोगस कंपन्यांच्या माध्यमातून २७ हजार शेतकऱ्यांना व बँकांना गंडवून साडेपाच हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. गुट्टे यांची छोटा नीरव मोदी अशी तुलना करत त्यांना अटक करण्याची मागणी मुंडे यांनी केली .मुंडे यांनी नियम २८९ अन्वये स्थगन प्रस्ताव मांडला.रत्नाकर गुट्टे व त्याच्या कुटुंबीयांच्या नावे एकूण २२ कंपन्या नोंदणीकृत असून यापैकी बहुतांश कंपन्या या निव्वळ कागदावर आहेत . या माध्यमातून गुट्टेने बँकांकडून कर्ज काढले आहे . गुट्टे यांच्या गंगाखेड शुगर्स कारखान्याने 'हार्वेस्ट अँण्ड ट्रान्सपोर्ट' या योजनेखाली २०१५ मध्ये ६०० पेक्षा अधिक शेतकºयांच्या नावे कर्जे उचलली. यापोटी शेतकºयांना मिळालेली वाहने या कारखान्याला कामावर लावली. कारखान्याकडे सर्व हप्त्यांची परतफेड करुनदेखील कारखान्याने या रकमा बँकांना परत केल्या नाही. परिणामी आता शेतकºयांना २० ते २५ लाख रुपयांच्या वसुलीसाठी बँकांच्या नोटिसा येत असल्याचा दावा मुंडे यांनी केला. यावेळी मुंडे यांनी गुट्टे यांच्या विविध आठ कंपन्या आणि त्यांनी घेतलेली कर्जे याची आकडेवारी सभागृहात सादर केली. गुट्टे यांनी १८५ बँका, पतसंस्था यांना गंडा घातल्याचा आरोप त्यांनी केला .>तर गुट्टे देश सोडून जाईलगुंतवणूकदारांचे पैसे थकविल्याच्या प्रकरणात 'डीएसके' समूहाचे डी.एस.कुलकर्णी व त्यांच्या कुटुंबांना अटक करण्यात आली . गुट्टे यांच्यावर ५ जुलै २०१७ रोजी याहून गंभीर गुन्हे दाखल झाले होते , मात्र त्यांना अद्याप अटक झालेली नाही . त्यांना सत्तापक्षाची मदत होत आहे. जर गुट्टे यांना ताब्यात घेतले नाही तर ते विदेशात पळून जाण्याचा धोका आहे, असेदेखील मुंडे यांनी म्हटले .त्यांचा पासपोर्ट ताब्यात घेण्याची मागणी त्यांनी केली>सरकारने चौकशी करावीसभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी मुंडे यांनी मांडलेला स्थगन प्रस्ताव नाकारला . मात्र हा विषय गंभीर असून गुट्टे ला अटक का होत नाही ते सरकारने स्पष्ट करावे. तसेच ६ ते ७ महिन्यात चौकशी पूर्ण होईल अशी व्यवस्था करण्याचे त्यांनी निर्देश दिले . या प्रकरणामुळे बँकिंग प्रणाली बुडण्याचा धोका असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली .>गुट्टेने या कंपन्यांच्या नावे घेतले कर्जकंपनी कर्ज (कोटींमध्ये)गंगाखेड शुगर्स अ‍ॅन्ड एनर्जी लि. १४६६.४४सुनील हायटेक इंजिनिअरींग लि. २४१३.३२गंगाखेड सोलर प्रा.लि. ६५५.७८गुट्टे इन्फ्रा प्रा.लि. ११८.५०सीम इंडस्ट्रीज लि. ८६.६५व्हीएजी बिल्टेक प्रा.लि. ३५.००व्हीआरजी डिजिटल कॉर्पोरेशन ३१.०६योगेश्वरी हॅचरीज प्रा.लि. ६५५.७८एकूण ५४६२.४३

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडे