शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील शेतकऱ्यांसाठी रत्नागिरीही खारीचा वाटा उचलणार

By admin | Updated: December 10, 2014 23:52 IST

राज्य शासनाच्या सहयोगाने जिल्हा परिषदेमार्फत शेतकऱ्यांना चाऱ्यासाठी बियाणे पुरवण्यात येणार

रहिम दलाल - रत्नागिरी -समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यातील स्थिती समाधानकारक असताना आता जिल्ह्यातील शेतकरी विदर्भ, मराठवाड्याचे अश्रू पुसणार आहे. राज्य शासनाच्या सहयोगाने जिल्हा परिषदेमार्फत शेतकऱ्यांना चाऱ्यासाठी बियाणे पुरवण्यात येणार असून त्याचा लाभ विदर्भ आणि मराठवाड्यातील भुकेने व्याकूळ जनावरांना होणार आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी जनावरांसाठी चारा उगवून ते दुष्काळग्रस्त जिल्ह्यांसाठी पुरवठा करणार आहेत. त्यासाठी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडून शेतकऱ्यांना बियाणे वाटप करण्यात येणार आहे़ दुष्काळगस्त जिल्ह्यांना वैरण पुरवठा केल्यानंतर त्यातून स्थानिक शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळेल तर भुकेने व्याकूळ विदर्भ, मराठवाड्यातील जनावरांना चारा मिळेल. यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पशुसंवर्धन विभागाकडून वैरण बियाण्याचे वाटप करण्यात येणार आहे़ त्यासाठी पशुसंवर्धन विभाग जिल्हा वार्षिक योजनेकडे ७ लाख रुपयांची मागणी करणार आहे़ एक एकरच्या क्षेत्रात चारा उत्पादन घेण्यासाठी १०० टक्के अनुदानावर ६०० रुपयांच्या वैरणाच्या बियाणांचा किंवा ठोंब्याचा पुरवठा करण्यात येणार आहे़ दुष्काळग्रस्त गावांमधील पशुधनाला आवश्यक तो चारा व पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाने जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतावर वैरण उत्पादनासाठी वैरण बियाणे वाटप करण्याचा निर्णय घेतला असून तसे परिपत्रक काढले आहे़ या शासन निर्णयाचा फायदा जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना होणार आहे़ त्यामुळे १०० टक्के अनुदानातून येथील शेतकरी जनावरांसाठी चाऱ्याचे उत्पादन करणार आहेत़जिल्ह्यात १०० टक्के अनुदानातून शेतकऱ्यांना बियाणे देण्यात येणार आहे़ त्यातून अतिरिक्त चारा उगवून टंचाईग्रस्त, दुष्काळग्रस्तांसाठी शासनाने मागणी केल्यास चारा पुरवठा करण्यात येईल़-डॉ़ एस़ सी़ म्हस्के, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी चारा लागवडीने दुष्काळग्रस्त जिल्ह्याला पुरवठा करणार.जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाचा पुढाकार.जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन.स्थानिक शेतकऱ्यांना आर्थिक लाभ तर विदर्भवासीयांना चारा.