शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

गटनेतेपदासाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच

By admin | Updated: March 6, 2017 02:17 IST

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित सदस्यांची बैठक रविवारी बारामती हॉस्टेल येथे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडली

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित सदस्यांची बैठक रविवारी बारामती हॉस्टेल येथे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडली. या वेळी पक्षाच्या गटनेतेपदासाठी १३ जणांनी इच्छा दर्शविली आहे. या वेळी गटनेता निवडीचे सर्वाधिकार पवार यांना देण्यात आले. मंगळवारी पक्षाच्या गटनेत्यांची निवड होऊन विभागीय आयुक्तांकडे नोंदणी केली जाईल.महापालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ४० नगरसेवक निवडून आले आहेत. या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार अजित पवार यांच्या हस्ते या वेळी करण्यात आला. शहराध्यक्ष व खासदार वंदना चव्हाण, महापौर प्रशांत जगताप या वेळी उपस्थित होते.गटनेतेपदासाठी वंदना चव्हाण यांनी काही नावे काढून आणली होती. त्याचबरोबर बैठकीमध्ये काहीजणांनी गटनेता बनण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार एकूण १३ जण गटनेते पदाच्या स्पर्धेमध्ये आहेत. यामध्ये प्रशांत जगताप, दत्तात्रय धनकवडे, दीपक मानकर, विशाल तांबे, चेतन तुपे, वैशाली बनकर, नंदा लोणकर, सुमन पठारे, रेखा टिंगरे, सुनील टिंगरे, बंडू गायकवाड यांचा समावेश आहे. महापालिका निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या पक्षाच्या नगरसेवकांच्या बैठकीमध्ये गटनेता निवडीची प्रकिया पार पाडल्यानंतर विभागीय आयुक्तांकडे जाऊन त्यांची नोंदणी करावी लागते. त्यानुसार रविवारी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची बैठक पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गटनेता हा पालिकेतील विरोधी पक्षनेता असणार आहे. भाजपाला महापालिकेत मोठे बहुमत मिळाले आहे, त्यामुळे सभागृहात भाजपाशी सामना करण्यासाठी राष्ट्रवादीला सक्षम विरोधी पक्षनेता द्यावा लागणार आहे. (प्रतिनिधी)>सक्षम विरोधी पक्षाची भूमिका पार पाडू महापालिकेच्या निवडणुकीचे निकाल अनपेक्षित असेच लागले आहे; मात्र जनतेचा कौल आपण स्वीकारला असून, पालिकेच्या सभागृहात सक्षम विरोधीपक्षाची भूमिका आपल्याला पार पाडायची असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी रविवारी नवनिर्वाचित नगरसेवकांशी बोलताना सांगितले.