शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

खगोलप्रेमींनी अनुभवले एकत्रित सूर्य-चंद्रबिंबाचे दुर्मीळ दर्शन

By admin | Updated: February 11, 2017 01:04 IST

नव्याच्या पौर्णिमेला पन्हाळा, मसाई पठारावर अवकाश निरीक्षकांची गर्दी; शुक्र अन् मंगळ ग्रहांची दिसली स्पष्ट छटा

संदीप आडनाईक ---कोल्हापूर --नव्याच्या पौर्णिमेला म्हणजे माघी पौर्णिमेला शुक्रवारी सायंकाळी अवकाश निरीक्षकांनी आणि खगोलप्रेमींनी लालभडक सूर्य आणि चंद्रबिंबाचे एकाच वेळेस दर्शन घेण्याची दुर्मीळ संधी अनुभवली. पन्हाळा आणि मसाई पठारासारख्या उंचावरील जागेवर ही अनोखी वैज्ञानिक जादू पाहण्यासाठी शौकिनांनी गर्दी केली.‘लोकमत’च्या टीमने कोल्हापूरपासून ३० किलोमीटर अंतरावरील पन्हाळ्याजवळील मसाई पठारावर या अनोख्या दर्शनाचा अनुभव घेतला. यावेळी मसाई पठाराच्या पश्चिम क्षितिजावर अगदी अल्पकाळ लालसर मोठे सूर्यबिंब आणि पूर्व क्षितिजावर तितकेच मोठे आणि लालसर चंद्रबिंब पाहण्याची सुवर्णसंधी मिळाली. ठीक सहा वाजता चंद्रोदय झाला; पण धुक्याच्या दुलईमुळे अगदी सूर्यास्त होण्याच्या आधी एक-दोन मिनिटांनी म्हणजे सहा वाजून ११ मिनिटांनी चंद्र क्षितिजावर पूर्णरूपात अवतरला आणि हे अनोखे आणि विहंगम दृश्य खगोलप्रेमींना अनुभवायला मिळाले. विशेष म्हणजे या माघ पौर्णिमेला सूर्यास्त आणि चंद्र्रोदय एकाच क्षितिजरेषेवर पाहायला मिळाले. याशिवाय अवकाशात शुक्र आणि मंगळ हे दोन्ही ग्रहही डोळ्यांनी अतिशय स्वच्छ आणि स्पष्टपणे दिसले. ‘दूरसंचार’चे निवृत्त अधिकारी वसंतराव घोरपडे, विभागीय अभियंता व्ही. एस. कालुगडे, एस. एस. मुरगे, ए. बी. चौगुले, एम. एम. पुजारी, एस. पी. चव्हाण तसेच रोहित कांबळे, मगदूम यांच्यासारख्या स्थानिकांनीही मसाई पठारावर हा अनुभव घेण्यासाठी ठाण मांडले होते. हौशी छायाचित्रकारांनीही ही संधी सोडली नाही. केआयटी कॉलेजचे प्रा. विवेक देसाई, प्रा. विदुला स्वामी तसेच शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. व्ही. जे. फुलारी आणि पीएच.डी.चे विद्यार्थी अविराज जत्राटकर, हौशी छायाचित्रकार सुनील साखरे यांनी पन्हाळ्यातील पुसाटी पॉइंटवरून हे दृश्य टिपले.सूर्य, पृथ्वी आणि चंद्र सरळ रेषेतपन्हाळ्यावरील पुसाटी पॉइंट आणि मसाई पठारावरून शुक्रवारी सायंकाळी नव्याच्या पौर्णिमेला सहा वाजण्याच्या सुमारास सूर्यास्त व चंद्रबिंब एकाच क्षितिजरेषेवर अवतरले. प्रत्येक पौर्णिमेला सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत येतात. चंद्र सूर्याच्या बरोबर विरुद्ध बाजूला असतो. त्यामुळे जेव्हा सूर्य मावळतो, तेव्हा चंद्र उगवत असतो. मात्र, प्रत्येक वेळी सूर्यास्ताची आणि चंद्रोदयाची वेळ एकच नसते; कारण चंद्राची पृथ्वीभोवतीची थोडी कललेली कक्षा. चंद्राची कक्षा ही सूर्य आणि पृथ्वी यांना जोडणाऱ्या काल्पनिक रेषेच्या प्रतलास समांतर अशी नाही. मात्र, पृथ्वीभोवतीच्या एका फेरीत ही कक्षा दोन वेळा या काल्पनिक प्रतलास छेदते. त्या दोन्ही वेळांना ग्रहणे घडून येतात.शुक्रवारी माघ पौर्णिमेला चंद्रग्रहण होते. यामुळे या दिवशी सूर्य, पृथ्वी आणि चंद्र अगदी सरळ रेषेत होते. पन्हाळ्यावर चंद्रोदयाची वेळ सूर्यास्ताच्या काही मिनिटांआधीच मिळाली. शुक्रवारी चंद्रोदयाची वेळ ५० मिनिटे उशिरा असल्यामुळे खगोल निरीक्षकांनी सूर्य आणि चंद्रबिंब दर्शनाचा एकत्र अनुभव घेतला.पन्हाळ्याजवळील मसाई पठारावरून शुक्रवारी नव्याच्या पौर्णिमेला (माघ) एकाच वेळेत म्हणजे सहा वाजून १२ मिनिटांनी सूर्यास्ताबरोबरच पूर्ण चंद्र पाहण्याची संधी अवकाश निरीक्षकांनी साधली. कॅमेऱ्याच्या पॅनोरमा व्ह्यूने टिपलेला हा योग..