मधुकर ठाकूर,
उरण- उरण नौदलाच्या अनधिकृत डिअरपार्क मध्ये मृत्यूच्या कचाट्यात सापडली ६१ चितळ जातीची दुर्मिळ हरणे आता सुरक्षिततेसाठी ठाणे जिल्ह्यातील नेचर पार्क आॅफ तानसा येथील अरण्यात आॅगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात हलविण्यात येणार आहेत. सुरक्षित स्थळी हलविण्यात येणार असल्यांना हरणांना हक्काचे घर मिळणार आहेच. २३ वर्षांपासून कोंडलेल्या हरणांना आता मोकळा श्वास घेता येणार असल्याने नौदल अधिकाऱ्यांसह वनविभागाचे अधिकारीऱ्यांनीही सुटकेचा निश्वास सोडला आहेत. उरण येथील नौदल अधिकाऱ्यांनी २३ वर्षापूर्वी विरंगुळा म्हणून दुर्मिळ चितळ जातीच्या तीन हरणांच्या जोड्या राणीच्या बागेतून येथील डिअरपार्कमध्ये पाळण्यास आणल्या होत्या. हरणांना चारा पाणी देण्यासाठी आणि त्यांच्या देखभालीसाठी एका मनुष्य बळाचीही तजवीज नौदल अधिकाऱ्यांनी केली होती. मागील २३ वर्षात तीन जोड्या हरणांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून हरणांची संख्या या घडीला ६१ पर्यंत पोहचली आहे. हरणांची संख्या वाढल्याने त्यांना स्वैरविहार करण्यासाठी जागा अपुरी पडू लागली आहे. तसेच त्यांच्या चाऱ्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. नौदलाकडे हरणांच्या देखभालीसाठी मनुष्यबळ वाढविण्यासाठी आर्थिक तरतूद नाही. त्यामुळे हरणांच्या देखभालीकडे नौदलाचे अक्षम्य दुर्लक्षच होत आहे. नौदलाचा हा दुर्लक्षपणा हरणांच्या जीवावर बेतू लागला होता. काही दिवसांपूर्वी नौदलाच्या डिअरपार्क मधून बाहेर पडून केगाव नागरी वस्तीत शिरलेल्या दोन हरणे नाहक मृत्युमुखी पडली होती. तर एक हरिण मागील महिन्यात मृत पावला होता. हरणांच्या मृत्युमुळे व्यथित झालेले प्राणी मित्र, निसर्गप्रेमी नागरिकांनी नौदल आणि वनविभागालाच दोषी ठरविले होते. त्यामुळे अनधिकृत डिअरपार्क मधील दुर्मिळ हरणांचे संरक्षण, देखभाल शक्य होत नसल्याची कबुली देत नौदलाचे तत्कालीन लेफ्ट. कमांडर के. आर. खिल्लारे यांनी वनखात्याला पत्र लिहून दुर्मिळ हरणे सुरक्षित स्थळी हलविण्याची विनंतीही केली होती. वन विभागानेही हरणांना सुरक्षित स्थळी हलविण्याच्या हालचाली सुरु केल्या होत्या. तसेच हरणांच्या सुरक्षितेचा प्रश्न आमदारांनी विधानसभेत सभागृहात उठविला होता. विधानसभेतही हरणांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर वनअधिकाऱ्यांनी दुर्मिळ चितळ जातीची हरणे संचालक मुंबईच्या वीरमाता जिजाबाई उद्यान आणि बोरीवलीच्या नॅशनल पार्कमध्ये हलविण्याबाबत संबंधितांकडे विचारणा केली होती. >विधानसभेत हरणांचा सुरक्षेचा प्रश्ननौदलानेच डिअरपार्कमधील ६१ हरणे सुरक्षित नसल्याचे सांगत त्यांच्या संरक्षणासाठी सुरक्षित जागी हलविण्याची मागणी वन विभागाकडे केल्यानंतर स्थानिक वन अधिकारी सुरेंद्र काळे यांनी हरणांच्या जिवितास धोका निर्माण झाल्याने तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलविण्याचा अभिप्राय वरिष्ठांकडे सादर केला होता. विधानसभेतही हरणांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. आॅगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात ठाणे जिल्ह्यातील नेचर पार्क आॅफ तानसा येथील अरण्यात हलविण्यात येणार आहे. २३ वर्षांपासून कोंडलेल्या हरणांना आता मोकळा श्वास घेता येणार असल्याने नौदल अधिकाऱ्यांसह वनविभागाचे अधिकारीऱ्यांनीही सुटकेचा श्वास सोडला आहे.>आॅगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात दुर्मिळ हरणांना ठाणे जिल्ह्यातील नेचर पार्क आॅफ तानसा येथील अरण्यात हलविण्यात येणार आहेत. याप्रकरणी ठाणे वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी एम. एम. कुलकर्णी यांच्याशी पत्रव्यवहार झाला आहे. - डी. बी. गायकवाड, वनसंरक्षक अधिकारी