शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

दारूबंदीसाठी रणरागिणी सरसावल्या !

By admin | Updated: November 1, 2016 18:11 IST

दारूच्या वाढत्या व्यसनामुळे अनेकांचे संसार रस्त्यावर आले असून यापुढे गावातून दारू कायमची हद्दपार करण्याचा निर्धार खामगाव तालुक्यातील आसा (दुधा)

ऑनलाइन लोकमत
खामगाव, (जि.बुलडाणा), दि. 01 -  दारूच्या वाढत्या व्यसनामुळे अनेकांचे संसार रस्त्यावर आले असून यापुढे गावातून दारू कायमची हद्दपार करण्याचा निर्धार खामगाव तालुक्यातील आसा (दुधा) या गावातील महिलांनी केला. गावातील अवैधरित्या चालणाºया हातभट्टया उध्वस्त करून दारू विक्रेत्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले. यामुळे आसा गावात दारूबंदीची पहाट उगवलेली आहे.
खामगाव तालुक्यातील आसा (दुधा) हे १४०० लोकसंख्या वस्तीचे गाव. गावात अनेक वर्षापासून हातभट्टीची दारू विक्री सुरू आहे. पोलिसांची नाममात्र कारवाई होते. परत दारू विक्रेते जैसे थे सक्रीय राहतात. छोट्याशा गावात ५० डबे हातभट्टीची दारू निघते हे विशेष. दारूच्या वाढत्या व्यसनामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. दारूमुळे गावात भांडणतंटे नेहमीच उद्भवत असून दारूकडे युवक वर्गाचा मोठ्या प्रमाणात कल वाढला आहे. तरूण पिढीला व्यसनाच्या आहारी गेल्याने गावकरी चिंतीत झाले. लग्न समारंभ, सार्वजनिक कार्यक्रमात दारूड्यांचा नेहमीचाच त्रास यामुळे नागरीक वैतागले. दारूड्यांचा घरी महिलांना विशेष त्रास सहन करावा लागतो. तेव्हा गावातुनच कायमची दारूविक्री बंद करण्यासाठी हिरकणी महिला मंडळाच्या सदस्य, सरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस मित्र मंडळ तसेच नागरीक यांनी एकत्र येवून निर्धार केला. हिवरखेड पोलीस स्टेशनचे  पोलीस निरीक्षक अढाव यांना दारूबंदीची माहिती दिली. त्यांनी लगेच होकार देत गावकºयांना पुर्णत: सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
२८ आॅक्टोबर रोजी १०० महिला दारूबंदीसाठी रस्त्यावर आल्या. गावात तसेच शेतात चालणाºया हातभट्टयावर पोलिसांच्या सहकार्याने धाडी टाकल्या. सुमारे ५२ हातभट्टीचे डबे व दारूचे साहित्य उध्वस्त केले. तसेच दारू काढणाºयांना पोलिसांच्या स्वाधीन केले. यापुढे गावात दारूविक्री होवू द्यायची नाही असा संकल्प गावकºयांनी केला. सरपंच मंगला रामदास गवई, पोलीस पाटील विजय पाटील, ग्रा.पं. सदस्य कपील बारगळ, रामदास गवई, हिरकणी महिला मंडळाच्या अध्यक्षा मिनाबाई हिवराळे, सुशिला गवई, बेबीताई तिडके, शिलाबाई इंगळे, प्रभाबाई गवई, प्रभाबाई हेलोडे, संगीता गवई, सुनिल गवई यांच्यासह शेकडो महिलांनी पुढाकार घेवून गावातून  दारू विक्री हद्दपार केली आहे.