शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
2
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
3
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
4
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
5
इराण-इस्रायल युद्धबंदीमुळे बाजार 'रॉकेट'; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
6
कोण आहे अलीफा अहमद?; पती डॉक्टर तर स्वत: TCS मध्ये करत होती नोकरी; आता बनल्या आमदार
7
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
8
UPI युजर्ससाठी मोठी बातमी! ट्रान्झॅक्शन फेल झालं तर लगेच मिळणार रिफंड; 'या' तारखेपासून लागू होणार नियम
9
पंतचा पराक्रम, एकाच कसोटीत दोन शतकं ठोकताना केले १० विक्रम, अशी आहे संपूर्ण यादी
10
पावसाने पाठ फिरवल्याने विदर्भासह मराठवाड्यात अत्यंत भीषण अवस्था !
11
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'
12
पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत...
13
"म्हाताऱ्याला वेड लागलंय", चाहत्याची कमेंट पाहून भडकले अमिताभ बच्चन, म्हणाले- "तुम्हाला..."
14
IPO ची धमाकेदार लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा डबल, ९९.४९ टक्क्यांचा फायदा
15
Health Tips: एक लवंग दूर करेल दाताचे, तोंडाचे, पोटाचे विकार; पण जाणून घ्या 'अचूक' वेळ!
16
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
17
धक्कादायक! विठ्ठल दर्शनाचा बोगस टोकन पास घेऊन पंढरपूर मंदिरात ७ जणांचा घुसण्याचा प्रयत्न
18
अरे का, मी पूजेला एकटी बसू शकत नाही? ट्रोल झाल्यावर अमृता खानविलकरने थेट विचारला प्रश्न
19
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
20
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?

रमजान ईद विशेष - पाण्याचा स्पर्श झाल्यावर आयातील दिसणारी रोहीणखेडची मशीद

By admin | Updated: July 5, 2016 20:27 IST

इ.स. १४३७ मध्ये बांधकाम करण्यात आलेली रोहीणखेड येथे एक प्राचिन मशीद आहे. या मशीदीच्या भिंतीवर आतील भागातून कुराणातील आयातील लिहील्या आहेत. या आयाती अदृष्य असून, पाण्याचा स्पर्श झाल्यावरच या

विवेक चांदूरकरबुलडाणा : इ.स. १४३७ मध्ये बांधकाम करण्यात आलेली रोहीणखेड येथे एक प्राचिन मशीद आहे. या मशीदीच्या भिंतीवर आतील भागातून कुराणातील आयातील लिहील्या आहेत. या आयाती अदृष्य असून, पाण्याचा स्पर्श झाल्यावरच याआयातील दृष्टीस पडतात. शेकडो वर्षांपूर्वी काही विशिष्ट द्रव्यापासून लिहिलेल्या या आयाती एकप्रकारचा चमत्कारच आहे.अजिंठा पर्वत रांगांच्या पश्चिमेस नळगंगा आणि जलगंगा या दोन नद्यांच्या पवित्र संगमावर रोहीणखेड हे प्राचिन गाव वसले आहे. निजामशाहीत रोहीणाबाद हे राजधानीचे शहर होते. इ.स. १४३७ मध्ये येथे खुदावंत खा महमदवीने एक मशीद बांधली.

या मशीदीमध्ये आतील भागाच्या भिंतीवर चहुबाजुने अरेबिक भाषेतील काही आयाती लिहील्या आहेत. या आयाती अदृष्य आहेत. मशीदीमध्ये प्रवेश केल्यावर या भिंतीवर काही लिहीले असावे असे निदर्शनास येत नाही.

मात्र, यावरून पाण्याने भिजलेला ओला कपडा फिरविल्यास सदर आयाती लाल अक्षरामध्ये दृष्टीस पडतात. हे एकप्रकारे आश्चर्यच असून, अशाप्रकारे आयाती असणारी ही एकमेव मशीद असण्याची शक्यता आहे. शेकडो वर्षांपूर्वी याआयाती लिहीण्यात आल्या आहेत. मात्र या कोणत्या द्रव्यातून लिहीण्यात आल्या आहेत, याचा उलगडा अजूनही होवू शकला नाही.ही मशीद सध्या पुरातत्व खात्याच्या अख्यत्यारीत आहे. त्यामुळे मशीद बंद असते तर केवळ शुक्रवारीच नमाज पडण्यासाठी मशीद खुली करण्यात येते. येथे पुरातत्व खात्याचा एक कर्मचारी नियुक्त करण्यात आला आहे.

 

मशीदिचे बांधकाम संपूर्ण दगडात करण्यात आले आहे. मशीदीमध्ये एक कारंजाही आहे. तसेच मागच्या बाजुला दोन खोल्या आहेत. यामधील एका खोलीतून भुयार असल्याचे सांगण्यात येते. मध्ययुगीन कालखंडात बांधण्यात आलेली ही मशीदनिजामकालीन बांधकाम शैलीचा एक उत्कृष्ट नमुना आहे. इतिहास संशोधकांसाठी ही एक पर्वणी असून, याबाबत संशोधन करण्याची गरज आहे.