शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

रमेश उपाध्यायचा जामीन अर्ज फेटाळला

By admin | Updated: November 13, 2016 02:22 IST

मालेगाव २००८ बॉम्बस्फोटातील आरोपी मेजर रमेश उपाध्यायचा जामीन अर्ज शनिवारी विशेष न्यायालयाने फेटाळला. लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितबरोबर मेजर रमेश

मुंबई : मालेगाव २००८ बॉम्बस्फोटातील आरोपी मेजर रमेश उपाध्यायचा जामीन अर्ज शनिवारी विशेष न्यायालयाने फेटाळला. लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितबरोबर मेजर रमेश उपाध्यायने बॉम्बस्फोटाचा कट रचल्याचा आरोप तपास यंत्रणेने केला आहे.लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित आणि मेजर रमेश उपाध्याय हे दोघेही अभिनव भारत या संघटनेचे सदस्य होते. बॉम्बस्फोटाचा कट रचण्यासाठी भोपाळ, फरिदाबाद आणि अन्य ठिकाणी झालेल्या बैठकीत उपाध्याय हजर होता, असा आरोप राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) केला आहे. ‘२५ व २६ जानेवारी रोजी फरिदाबादमध्ये एक गुप्त बैठक झाली. हिंदूंसाठी स्वतंत्र झेंडा (भगवा) आणि स्वतंत्र संविधान असण्याची आवश्यकता असल्याचे मत पुरोहितने बैठकीत व्यक्त केले आणि त्याला उपाध्यायने दुजोरा दिला होता. भारत सरकारविरुद्ध हिंदूंचे राष्ट्र निर्माण करण्याची इच्छाही पुरोहितने या बैठकीत व्यक्त केली होती,’ असे एनआयएन दोषारोपपत्रात म्हटले आहे.मात्र उपाध्यायने हा आरोप फेटाळला आहे. संबंधित बैठकीत अभिनव भारत स्थापण्यासाठी चर्चा करण्यात आली होती. एनआयएने दोषारोपपत्रात नमूद केलेल्या संवादाला काहीही अर्थ नाही. समाजात चाललेल्या गैरप्रकारांविषयी लोकांमध्ये चीड होती आणि बैठकीच्या निमित्ताने त्यांनी त्या रागाला मोकळी वाट करून दिली. या बैठकीत करण्यात आलेल्या चर्चेवर कधीच कोणत्याही प्रकारे अंमलबजावणी होऊ शकत नाही. या बैठकीत मालेगावमध्ये बॉम्बस्फोट करण्याविषयी चर्चाच झाली नाही, असे उपाध्यायने जामीन अर्जात म्हटले आहे.तपास यंत्रणेने अभिनव भारतच्या अध्यक्षांची व बैठकीत उपस्थित असलेल्या अन्य समभासदांची चौकशी का केली नाही, असा प्रश्नही उपाध्यायने जामीन अर्जात उपस्थित केला आहे.उपाध्यायच्या जामीन अर्जावर विशेष सरकारी वकील अविनाश रसाळ यांनी आक्षेप घेतला. ‘बैठकीत मालेगावमध्ये बॉम्बस्फोट करण्याबाबत चर्चा करण्यात आली नसली तरी मुस्लीम समाजावर हल्ला करण्याबाबत चर्चा करण्यात आली होती. उपाध्याय आणि पुरोहितच्या फोनच्या कॉल डाटा रेकॉर्डवरून (सीडीआर) हे दोघेही एकमेकांच्या संपर्कात असल्याचे सिद्ध झाले आहे. पुरोहितच्या कृत्यामुळे अभिनव भारतच्या अध्यक्षांनी आणि अन्य सदस्यांनी त्यांचे सदस्यत्व रद्द केले, असा युक्तिवाद अ‍ॅड. रसाळ यांनी विशेष न्यायालयात केला. एनआयए, एटीएसकडे उपाध्यायविरुद्ध असलेले सबळ पुरावे लक्षात घेत विशेष न्यायालयाने उपाध्यायचा जामीन अर्ज फेटाळला. (प्रतिनिधी)