शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
4
नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
5
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
6
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
7
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
8
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
9
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
10
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
11
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
12
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
13
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
14
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
15
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
16
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
17
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
18
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
19
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
20
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
Daily Top 2Weekly Top 5

रमेश कदम फरार!

By admin | Updated: July 21, 2015 01:43 IST

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील ३८५ कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणी मुख्य आरोपी असलेले महामंडळाचे माजी

मुंबई/सोलापूर : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील ३८५ कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणी मुख्य आरोपी असलेले महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम फरार झाले आहेत. सीआयडीने सोमवारी मुंबईतील त्यांचे निवासस्थान आणि काही संस्थांवर छापे टाकले. भ्रष्टाचारप्रकरणी कदम यांच्यासह पाच जणांविरुद्ध मुंबईच्या दहीसर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सोमवारी त्यांच्या शोधासाठी तुळजापूरला (जि. उस्मानाबाद) गेलेले पोलीस पथकही रिकाम्या हाताने परतले. मात्र रमेश कदम यांची शोधमोहीम ग्रामीण पोलिसांनी सुरूच ठेवली आहे. शनिवारी रात्री गुन्हे दाखल झाल्यानंतर कदम यांनी रविवारी सोलापूरमध्ये पत्रपरिषद घेतली होती. त्याचवेळी आपल्याला अटक होणार असल्याची कुणकुण त्यांना लागल्याने पत्रकार परिषद अर्धवट सोडून ते निघून गेले. त्यानंतर काही वेळाने ग्रामीण आणि शहर पोलीस दलाचे पथक तेथे आले. होटगी रोडवरील बालाजी सरोवरमध्ये रमेश कदम उतरल्याचे समजताच पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तिकडे धाव घेतली. ज्या रूममध्ये ते उतरले, त्याच रूममध्ये त्यांचा मोबाईल होता. कदाचित हॉटेलमध्येच रमेश कदम असतील म्हणून रात्री उशिरापर्यंत पोलीस थांबून होते. पण रमेश कदम काही परतलेच नाही. विश्वसनीय सूत्रांनी सांगितले की कदम आपल्या काही कार्यकर्त्यांसह पोलिसांना सोमवारी दिवसभर गुंगारा देत होते. काही पोलिसांना हाताशी धरण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. सीआयडीच्या वेगवेगळ्या पथकांनी कदम यांचे मुंबईतील बोरीवलीतील निवासस्थान आणि ते अध्यक्ष असलेल्या जोशाबा ग्राहक संस्थेत छापे टाकून भ्रष्टाचाराशी संबंधित काही कागदपत्रे जप्त केली.