शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

रमेश कदमच्या संपत्तीची चौकशी

By admin | Updated: August 31, 2015 01:27 IST

अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणातील प्रमुख आरोपी व राष्ट्रवादी काँग्रेसचे निलंबित आमदार रमेश कदम यास सोबत

औरंगाबाद : अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणातील प्रमुख आरोपी व राष्ट्रवादी काँग्रेसचे निलंबित आमदार रमेश कदम यास सोबत घेऊन राज्य गुन्हा अन्वेषण पथक (सीआयडी) २९ आॅगस्टपासून औरंगाबाद मुक्कामी आहे. कदम याच्या येथील संपत्तीची चौकशी सुरूआहे.रविवारी दिवसभर कदम याने औरंगाबादेत खरेदी केलेल्या संपत्तीची अधिकाऱ्यांनी पाहणी केली व ज्यांच्याकडून संपत्ती खरेदी केली त्यांचे जवाब नोंदवून घेण्यात आले. साठे महामंडळातील घोटाळ््याप्रकरणी मुंबईतील दहीसर पोलीस ठाण्यात कदमसह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. राज्य सीआयडी तपास करीत आहे. तपास अधिकाऱ्यांनी रविवारी कदमच्या सिडकोतील भक्तीनगरमधील भूखंडावरील बंगल्याची पाहणी केली. औरंगाबादेतील पवनदीपसिंग कोहली यांना ११ कोटी ५० लाख रुपयांचा डीडी देऊन त्याने बीड बायपास येथे ६२ गुंठे जमीन खरेदी केली. यूपीएससी आणि एमपीएससी मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याकरिता त्याने महामंडळाच्या नावे जालना रोडवरील फतेपूर येथील २ एकर जमीन खरेदी करण्यासाठी महामंडळाकडून १० कोटी ७५ लाख रुपये घेतले. या जमिनीपैकी त्याने २० गुंठे जमीन महामंडळाच्या नावे केली, तर उर्वरित जमीन स्वत:च्या नावे केली. अधिकाऱ्यांनी त्यास सोबत घेऊन जागांची पाहणी केली. या प्रकरणातील काही लोकांचे जवाब नोंदवून घेतले. आमचा तपास सुरू आहे, असे पोलीस अधीक्षक दत्तात्रय मंडलिक यांनी सांगितले. (प्रतिनिधी)