शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

अटक टाळण्यासाठी रमेश कदमचे भारतभ्रमण !

By admin | Updated: August 20, 2015 01:27 IST

‘चोर तो चोर वर शिरजोर’ या म्हणीचा अनुभव सध्या राज्य गुन्हे अन्वेषण खात्याला (सीआयडी) राष्ट्रवादी काँग्रेसचे निलंबित आमदार रमेश कदम यांच्या प्रकरणात येत

डिप्पी वांकाणी, मुंबई‘चोर तो चोर वर शिरजोर’ या म्हणीचा अनुभव सध्या राज्य गुन्हे अन्वेषण खात्याला (सीआयडी) राष्ट्रवादी काँग्रेसचे निलंबित आमदार रमेश कदम यांच्या प्रकरणात येत आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या निधीच्या वाटपासाठी मी सही केलेला एक तरी कागद दाखवा, असे आव्हान त्याने चौकशी अधिकाऱ्यांना दिले आहे. या महामंडळाच्या निधीच्या कथित भ्रष्टाचाराबद्दल कदमवर आरोप आहेत. त्याच महामंडळातील आर्थिक गैरव्यवहारांची तक्रार करायला मीच निघालो होतो ही वस्तुस्थिती आहे, असे त्याने सीआयडीच्या अधिकाऱ्यांना सांगितले. सीआयडीमधील अंतर्गत सूत्रांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार रमेश कदमने बनावट ओळखपत्रांच्या आधारावर काश्मीर, बंगळुरू, दिल्ली आणि कन्याकुमारी अशा विविध ठिकाणी प्रवास केला व तो गेल्या महिन्यात भूमिगत झाल्यापासून पंचतारांकित हॉटेल्समध्ये मुक्कामाला होता.महामंडळात मी अ-कार्यकारी (नॉन एक्झिक्युटिव्ह) व्यक्ती होतो व मी महामंडळाच्या निधीचे वितरण किंवा त्याच्या निधीच्या प्रस्तावांच्या दस्तावेजांवर कधीही स्वाक्षरी केली नाही, असे त्याने आम्हाला सांगितल्याचे अधिकारी म्हणाला. माझी सही असलेला एक तरी कागद दाखवा, असे तो सतत आम्हाला म्हणत आहे. आता तो महामंडळाचे महाव्यवस्थापक आणि उप महाव्यवस्थापक अशा सदस्यांना चुकीच्या गोष्टींसाठी दोष देत आहे, असे वरिष्ठ अधिकारी म्हणाला. गेल्या महिन्यात कदमने काश्मीर ते कन्याकुमारी असा प्रवास केला. त्याने या गुन्ह्यातील त्याच्या साथीदारांची ओळखपत्रे घेऊन त्यांच्या छायाचित्रांच्या जागी स्वत:चे छायाचित्र लावले व त्याचा वापर केला. वस्तुस्थिती ही आहे, की त्याने येथून पुण्यातील हॉटेलसाठी बुकिंग केलेच नव्हते. काश्मीरमधील गँ्रड हयात रिजन्सीमध्ये तो राहिला व तेथून त्याने पुण्यातील हॉटेलसाठी बुकिंग केले, असे हा अधिकारी म्हणाला.