शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

अन रामदास आठवले मुख्यमंत्री बनले

By admin | Updated: February 11, 2016 09:08 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळावे यासाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले प्रयत्नशील आहेत. मात्र, भाजपाला आठवले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळावे यासाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले प्रयत्नशील आहेत. मात्र, भाजपाला आठवले यांना मंत्री करण्याची कोणतीच घाई नाही. असे असले तरी आठवले आता थेट मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर आरूढ होणार आहेत. नगर जिल्ह्यातील युवा दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांच्या ‘कन्यारत्न’ नावाच्या चित्रपटात रामदास आठवले मुख्यमंत्र्यांची भूमिका साकारत आहेत. मुलगी वाचवा, मुलगी जगवा, शिकवा असा सामाजिक संदेश देणाऱ्या या चित्रपटाचे शूटिंग कर्जत व शिरूर परिसरात झाले. पांढरा झब्बा आणि ब्लॅक जॅकेट परिधान केलेल्या आठवलेंनी कॅमेऱ्यासमोर मुख्यमंत्र्याची भूमिका वठवली. रामदास आठवलेंसोबतच या चित्रपटात रासपचे नेते महादेव जानकर, राष्ट्रवादीचे नेते संजय पाटील आदी नेते पाहुणे कलाकार असणार आहेत.या चित्रपटाबाबत बोलताना शिवाजी दोलतडे म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेसाठी चर्चेतील चेहरा हवा होता. तेव्हा आठवले या भूमिकेसाठी योग्य व्यक्ती वाटले. आठवले यांनी यापूर्वी अनेक चित्रपटांच्या आॅफर नाकारल्या आहेत. मात्र, हा चित्रपट सामाजिक विषयावर भाष्य करणारा असल्याने त्यांनी होकार दिला व आम्हाला मुख्यमंत्री मिळाले. (प्रतिनिधी)