शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांवरील हल्ल्याविरोधात जनजागृतीसाठी रॅली

By admin | Updated: September 10, 2016 02:26 IST

गणेशोत्सवात विविध कार्यक्रम, मिरवणूक, विसर्जनाच्यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी होते.

पनवेल : गणेशोत्सवात विविध कार्यक्रम, मिरवणूक, विसर्जनाच्यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. कायदा व सुव्यवस्था टिकविण्यासाठी पोलीस नेहमीच प्रयत्नशील असतात. मात्र काही समाजकंटक पोलिसांशी हुज्जत घालतात. हे प्रकार थांबविण्यासाठी पनवेल, खारघर व तालुका पोलिसांच्या वतीने पनवेल शहर तसेच खारघर वसाहत आणि नेरे गावात तसेच कळंबोली पोलिसांच्या वतीने कळंबोली शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली होती. रॅलीत शेकडो नागरिक सहभागी झाले होते.पनवेल शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल बाजारे यांनी आयोजित केलेल्या रॅलीची सुरुवात शिवाजी अश्वारूढ पुतळ्यापासून करण्यात आली. यात पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रकाश निलेवाड यांच्यासह सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, विविध सामाजिक संघटना, संस्था, मोहल्ला कमिटी, शालेय विद्यार्थी, दक्षता समिती, महिला मंडळे सहभागी झाले होते. तर तालुका पोलीस ठाण्याच्या अंतर्गत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात होणाऱ्या पोलीसांवरील हल्यासंदर्भात नेरे गावात रॅली काढण्यात आली होती. विश्वेश्वर मंदिरापर्यंत रॅलीची सांगता झाली. त्यामध्ये महिला व मुलीची छेडछड होणार नाही याची दक्षता घ्यावी, न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करावे, पोलीसांचा आदर करा, पोलीसांनी दिलेल्या सूचनाचे पालन करा, गणपतीच्या विसर्जनास अडथळानिर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच पोलीसकर्मचारी व अधिकारी यांच्याशी वाद होईल असे कृत्य करू नका. पोलीस हे जनतेचे मित्र आहेत, असा संदेश नेरे तसेच कळंबोली येथील जनतेस रॅलीतून देण्यात आला. रॅलीमध्ये तालुका पोलीस ठाण्याचे सर्व पोलीस कर्मचारी, पोलीस अधिकारी, पोलीस मित्र, महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिक सहभागी झाले होते.