शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

‘दिवाळी भेट’साठी कामगार संघटनांची धावाधाव

By admin | Updated: October 8, 2016 04:35 IST

दिवाळी भेट म्हणून १५ हजार रुपये देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेकडून एसटी महामंडळाकडे करण्यात आली

मुंबई : एसटी कामगारांना दिवाळी भेट म्हणून १५ हजार रुपये देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेकडून एसटी महामंडळाकडे करण्यात आली आहे. मान्यताप्राप्त संघटनेकडून मागणी केलेली असतानाच अन्य एसटी संघटनांनीही यंदा दिवाळी भेटसाठी महामंडळाला साकडे घातले आहे. यावर योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन महामंडळाकडून देण्यात आले. गेल्या वर्षी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेकडून १५ हजार रुपये दिवाळी भेट देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावेळी महामंडळाने कर्मचाऱ्यांना २,५00 रुपये तर अधिकाऱ्यांना पाच हजार रुपये दिवाळी भेट देण्यात आली. यंदाही १५ हजार रुपये दिवाळी भेट देण्याची मागणी करण्यात आल्याची माहिती संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी दिली. कामगारांना दिवाळी भेट देताना कोणताही भेदभाव करू नये, असेही ते म्हणाले. ही मागणी केलेली असतानाच महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस जाहीर करण्यात आल्याचे सांगितले. तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना ३0 दिवसांचा बोनस देण्यात येणार आहे.पालिका कर्मचाऱ्यांनाही भरघोस दिवाळी भेट देण्यात येत असल्याने त्याच धर्तीवर एसटीने उत्पादकतेचा विचार न करता दिवाळी भेट द्यावी, अशी मागणी केल्याचे सांगितले. महाराष्ट्र एसटी कामगार सेनेकडूनही महागाई भत्ता व दिवाळी भेट देण्यासंदर्भात मागणी करण्यात आली आहे. दिवाळी सण आॅक्टोबर अखेरीस येत असल्याने महागाई भत्त्यातील उर्वरित ७५ टक्के रक्कम, कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी देण्यात यावी. त्याचप्रमाणे गेल्या वर्षी २,५00 रुपये दिवाळी भेट कर्मचाऱ्यांना देण्यात आली होती. या वर्षी दिवाळीचा आनंद द्विगुणीत करण्यात यावा, अशी मागणी केल्याचे कार्याध्यक्ष शिवाजीराव चव्हाण यांनी सांगितले. (प्रतिनिधी)>दिवाळी भेट म्हणून मान्यताप्राप्त संघटनेने १५ हजार रुपये देण्याची मागणी केली आहे. तर अन्य काही संघटनांनीही वाढीव दिवाळी भेट देण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे. कामगारांना दिवाळी भेट देण्याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल. - दिवाकर रावते, परिवहनमंत्री व एसटी अध्यक्ष