शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

‘राजीव गांधी जीवनदायी योजना’ २१ कोटी ३० लाख खर्च

By admin | Updated: April 6, 2017 02:44 IST

२०१२-१७ या कालावधीत तब्बल चार हजार ५२३ रुग्णांवर सात हजार ९२७ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

आविष्कार देसाई,अलिबाग- रायगड जिल्ह्यामध्ये राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंर्तगत २०१२-१७ या कालावधीत तब्बल चार हजार ५२३ रुग्णांवर सात हजार ९२७ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. यासाठी सरकारने भरघोस असे २१ कोटी ३० लाख रु पये खर्च केले आहेत. राजीव गांधी योजनेंर्तगत कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात सर्वाधिक उपचार करण्यात आले आहेत. त्यामुळे हे रुग्णालय रुग्णांसाठी खरोखरच जीवनदायी ठरले आहे.राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेला रायगड जिल्ह्यात नोव्हेंबर २०१४ मध्ये योजनेची सुरुवात झाली. ८ आॅगस्टला २०१४ रोजी नॅशनल इन्शुरन्स कंपनी आणि सरकार यांच्यामध्ये त्याबाबतचा करार झाला आहे. ज्या नागरिकांकडे पिवळी, केशरी, अंत्योदय योजनेतील रेशन कार्डेआहेत, त्या सर्वांच्या विम्याची रक्कम केंद्र सरकार भरते. कार्डावर ज्यांची नावे आहेत ते या उपचार खर्चास पात्र ठरतात. दीड लाख रुपयांपर्यंत ही मर्यादा असली तरी किडनीवरील उपचार खर्चासाठी अडीच लाख रुपयापर्यंत रक्कम वाढविण्यात आली आहे.राज्यात पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्त्वावर मुंबई, रायगड, सोलापूर, नांदेड या जिल्ह्यांत ही योजना सुरू झाली. या योजनेअंतर्गत सरकारने वार्षिक एक लाख रुपये उत्पन्न आणि रेशन कार्ड असलेल्या कुटुंबाची माहिती एकत्रित केलेली आहे. त्या कुटुंबाचा आरोग्य विमा सरकारने रक्कम भरून उतरविला आहे. सध्या मोठ्या रुग्णालयात ज्यांनी आरोग्य विमा उतरवला आहे, त्यांच्यावर कॅशलेस उपचार होतात. पण बहुतेक गरीब मध्यमवर्गीय कुटुंबांनी अद्याप विमा उतरविला नाही. त्यामुळे ते उपचाराच्या खर्चाच्या भीतीने मोठ्या खासगी रुग्णालयात जाऊ शकत नाहीत. एवढेच काय, एखाद्या विशेष तज्ज्ञाला प्रकृती दाखविण्यासाठी केसपेपर काढण्यास दोनशे रु पये खर्च येतो त्यामुळे अनेक जण मोठ्या खासगी रु ग्णालयात जाणे टाळतात. सध्या पिवळ्या रेशन कार्डधारकांच्या हदयशस्त्रक्रि येचा खर्च सरकार करत होते. आता केशरी कार्डधारक म्हणजे ज्यांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपये असलेल्या कुटुंबांनाही त्याचा लाभ मिळणार असल्याचे या योजनेच्या रायगड जिल्हा समन्वयक डॉ. प्रियांका फोंडे यांनी सांगितले. केवळ हृदयशस्त्रक्रि याच नाही, तर कोणत्याही गंभीर स्वरूपाच्या आजारासाठी दीड लाख रुपये खर्चाच्या मर्यादेत मोठ्या रु ग्णालयात उपचार घेता येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या योजनेत सहभागी होण्यासाठी सर्व मोठ्या खासगी रुग्णालयांनी होकार दिला आहे. आजपर्यंत अशा मोठ्या दवाखान्यातील बिलाच्या भीतीमुळे लोक या दवाखान्यांकडेही फिरकत नव्हते. आता कुटुंबातील कोणालाही अशा दवाखान्यात एक पैसाही न भरता उपचार घेणे शक्य होणार आहे.रुग्णालयांची नावेअष्टविनायक रुग्णालय, मुंबईसेव्हन हिल्स, मुंबईएमजीएम, कामोठेएमजीएम, कळंबोलीटाटा रुग्णालय, खारघरउपजिल्हा रुग्णालय, माणगावजिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबाग१ जानेवारी ते ३१मार्च २०१७ याकालावधीत सर्वाधिक १४२६ आजारांवर उपचार करण्यात आले आहेत. त्यासाठी पाच कोटी ४६ लाख रु पये खर्च करण्यात आले आहेत.या योजनेअंतर्गत सरकारने वार्षिक एक लाख रु पये उत्पन्न आणि रेशन कार्ड असलेल्या कुटुंबाची माहिती एकत्रित केलेली आहे. त्या कुटुंबाचा आरोग्य विमा सरकारने उतरविला.योजनेत सहभागी होण्यासाठी मोठ्या खासगी रुग्णालयांनी होकार दिला आहे.