शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

rajendradarda.com डायनॅमिक संकेतस्थळाचे उदघाटन

By admin | Updated: November 22, 2015 08:30 IST

लोकमत वृत्तपत्र समूहाचे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा यांच्या डायनॅमिक स्वरूपातील rajendradarda.com या संकेतस्थळाचे उदघाटन आज त्यांच्या वाढदिवशी चाहत्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि.२२ -  लोकमत वृत्तपत्र समूहाचे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा यांच्या डायनॅमिक स्वरूपातील rajendradarda.com  या संकेतस्थळाचे उदघाटन आज त्यांच्या वाढदिवशी चाहत्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. राजेंद्र दर्डा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह त्यांच्या चाहत्यांची लोकमत भवनात रीघ लागली होती. या चाहत्यांच्या गराड्यात माऊसद्वारे क्लिक करून राजेंद्र दर्डा यांनी या आधुनिक  संकेतस्थळाचे उदघाटन केले.
उपस्थित मान्यवर व चाहत्यांशी हितगुज करताना राजेंद्र दर्डा यांनी या संकेतस्थळाविषयीची भूमिका विशद केली. सन २००० मध्ये त्यावेळच्या तंत्रज्ञानासह हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले. त्यानंतर सर्वसामान्यांशी थेट आदान-प्रदान करणा-या फीचरसह २०१२ मध्ये  हे संकेतस्थळ अद्ययावत करण्यात आले. आता माहिती तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे संकेतस्थळ पाहण्याचे माध्यमही बदलले आहे. त्यामुळे डेस्कटॉपसह स्मार्टफोन व टॅब्लेटवर सहज पाहता येईल अशा फीचर व आकर्षक डिझाईनसह डायनामिक स्वरूपात rajendradarda.com हे संकतेस्थळ अद्ययावत करण्यात आले आहे. 
राजेंद्र दर्डा म्हणाले की, माझ्या आयुष्यातील सर्व महत्त्वाचे क्षण, प्रसंग, स्मृती व विविध क्षेत्रातील कामगिरी  भविष्यात अभ्यासकांना विश्वासार्ह संदर्भ म्हणून निश्चितपणे उपयोगी ठरू शकेल, असा लेखाजोखा या अत्याधुनिक संकेतस्थळावर टाकण्यात आहे. माझ्या आयुष्यातील महत्त्वाचे क्षण व चित्रे या संकेतस्थळावर मी शेअर केली आहेत. यवतमाळातील बालपण, १९७४ मध्ये परदेशातून परतल्यावर नागपूर, जळगाव व औरंगाबादेतील वास्तव्य, बातमीदारीपासून तर संपादक म्हणून अग्रलेखांपर्यंतची दीर्घकाळ केलेली सक्रिय पत्रकारिता, भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, आंतरराष्ट्रीय नेत्यांसमवेत पत्रकार म्हणून केलेल्या दौ-यांचे वार्तांकन, लेख, मुलाखती, छायाचित्रे, विविध दैनिकांत व पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची कात्रणे, मिळालेले सन्मान, भाषणांचे व्हिडिओ, झुंबर, व्हायब्रंट न्हिनगेट व आमचे विद्यापीठ ही पुस्तके, राजकारणातील प्रवेश, उत्कृष्ट संसदपटू, आमदार, राज्यमंत्री व कॅबिनेट मंत्री म्हणून केलेले दीड दशकातील काम, देशातील सर्व राज्यांच्या मंत्र्यांच्या कार्यगटाचे नेतृत्व, विविध देशातील शिष्टमंडळांशी चर्चा, उद्योग व शिक्षण क्षेत्रातील ऐतिहासिक निर्णय आदींचा आढावा लेख, बातम्या व छायाचित्रांच्या माध्यमातून rajendradarda.com या संकेतस्थळावर घेण्यात आला आहे.
या संकेतस्थळावर आकर्षक होमपेज, प्रोफाईल, अॅचिव्हमेंटस्, भाषणे, आर्टिकल्स, फोटो गॅलरी, व्हिडिओ, न्यूज व अपडेटस् आणि फीडबॅक असे भाग करण्यात आले आहेत.