शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

राजनविषयी सीबीआय अंधारात

By admin | Updated: November 10, 2015 02:34 IST

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनशी संबंधित गुन्ह्यांची सर्व प्रकरणे सीबीआयकडे सुपुर्द करण्याची घोषणा करून चार दिवस उलटले असले तरी सीबीआयला मात्र अद्याप

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनशी संबंधित गुन्ह्यांची सर्व प्रकरणे सीबीआयकडे सुपुर्द करण्याची घोषणा करून चार दिवस उलटले असले तरी सीबीआयला मात्र अद्याप महाराष्ट्र सरकारकडून यासंदर्भात कोणतीही सूचना मिळालेली नाही. एक-दोन दिवसांत सीबीआयला याबाबत सूचित केले जाईल. आठवडाअखेरच्या सुटीने या कामी दिरंगाई झाल्याचे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले.बनावट पासपोर्ट प्रकरणात छोटा राजन सीबआयच्या ताब्यात आहे. बाली येथून त्याची भारतात रवानगी करण्यात आली, त्याच दिवशी अतिरिक्त मुख्य गृहसचिव के. पी. बक्षी यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र सरकारने छोटा राजनशी संबंधित गुन्ह्यांची सर्व ६९ प्रकरणे सीबीआयकडे सुपुर्द करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा केली होती. छोटा राजनविरुद्ध महाराष्ट्रात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांच्या तपासाबाबत सीबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला विचारले असता त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, आम्ही याप्रकरणी तपास करायचा काय, या संदर्भात आम्हाला महाराष्ट्र सरकारकडून अद्याप अधिकृतपणे सूचित करण्यात आलेले नाही. एकीकडे तातडीने घोषणा करण्यात येऊनही त्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात तत्परता दाखविण्यात आलेली नाही. दुसरीकडे गृह खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्याने वाद ओढवून घेण्याची त्यांची इच्छा नाही. त्यामुळेच छोटा राजनच्या गुन्ह्यांचा तपास सीबीआयकडे सुपुर्द करण्यात आला, अशी आयपीएस अधिकाऱ्यांच्या गोटात दबक्या आवाजात चर्चा आहे.बोटाच्या ठशांमुळे राजन भारताच्या ताब्यातमुंबई : कुख्यात गँगस्टर छोटा राजन ऊर्फ राजेंद्र निकाळजे याला इंडोनेशियाकडून भारताच्या ताब्यात घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी ३५ वर्षांपूर्वी घेतलेले त्याच्या हाताच्या बोटांचे ठसे ओळख पटविण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले आहेत. टिळकनगर पोलीस ठाण्यात उपलब्ध असलेली ‘त्या’ मूळ प्रतींची शहानिशा केल्यानंतर राजनला भारताकडे सुपुर्द करण्यात आले अन्यथा राजनची ओळख पटविण्यासाठी त्याची डीएनए टेस्ट घ्यावी लागली असती.पोलिसांनी ३५ वर्षांपूर्वी घेतलेल्या राजनच्या हाताच्या ठशांच्या कागदाच्या प्रती १० वर्षांपूर्वीच्या झालेल्या अतिवृष्टीवेळी भिजल्या होत्या. त्यात या कागदांचे तीन तुकडे झाले होते. मात्र पोलिसांनी ते जुळवून स्कॅन करून पाठविले. इंडोनेशिया दूतावासाने या पुराव्याच्या आधारावर राजनचा ताबा भारताकडे दिल्याचे अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. छोटा राजनला ताब्यात घेण्यासंदर्भात त्याच्याविरुद्धच्या गुन्ह्यांची माहिती व त्यासंबंधी अन्य पुरावे घेऊन क्राइम ब्रँचमधील दोन अधिकारी ३० आॅक्टोबरला दिल्लीला गेले होते. त्यावेळी पकडला गेलेला इसम हा छोटा राजनच आहे, हे पटवून देण्यासाठी त्याच्या अटकेवेळी काढण्यात आलेल्या फिंगर प्रिंटची झेरॉक्स कॉपी होती. मात्र त्याची मूळ प्रत पाहिल्याशिवाय इंडोनेशियाकडून त्याचा ताबा मिळणे शक्य नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)फिंगर प्रिंट्सचा आठवडाभर शोधएका वॉचमनची हत्या व पोलिसांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी छोटा राजनला टिळकनगर पोलिसांनी १९८० मध्ये अटक केली होती. त्यानंतर दोन वर्षांनी याच पोलिसांनी अजून एका हत्येप्रकरणी पुन्हा त्याला अटक केली होती. त्या वेळी हाताचे ठसे घेतले होते. त्यानंतर तब्बल ३३ वर्षांनंतर तो गेल्या २५ आॅक्टोबरला इंडोनेशियात सापडला. मात्र आपण मोहनकुमार असल्याचे तो सांगत असल्याने त्याची ओळख पटविण्यासाठी फिंगर प्रिंट्सची मूळ कॉपी शोधण्याचे काम युद्धस्तरावर करण्यात आले. त्यासाठी टिळकनगर पोलीस ठाण्याच्या निरीक्षक मनीषा शिर्के यांच्या नेतृत्वाखाली सहा जणांचे पथक तब्बल आठवडाभर पोलीस ठाण्याच्या ‘रेकॉर्ड रूम’मधील हजारो कागदपत्रे तपासत होते. अखेर राजनच्या हातांच्या ठशांचे कागद तीन तुकड्यांमध्ये आढळले. फिंगर प्रिंट्सबरोबरच राजनच्या जन्मतारखेची ओळख पटविण्यासाठी पोलिसांना त्याच्या शाळेतून जन्म दाखल्याची प्रत मिळवावी लागली. अधिकाऱ्यांचे पथक दिल्लीला रवाना होण्यासाठी विमानतळावर पोचले असताना पोलिसांनी जन्म दाखल्याची प्रत त्यांच्याकडे दिली.