शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरे दहीहंडीला ठाण्यात?

By admin | Updated: August 23, 2016 03:25 IST

दहीहंडीच्या उंचीबाबत न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देऊन ठाणे मनसेने ९ थरांची दहीहंडी लावण्याचा निर्धार पक्का केला

स्नेहा पावसकर,

ठाणे- दहीहंडीच्या उंचीबाबत न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देऊन ठाणे मनसेने ९ थरांची दहीहंडी लावण्याचा निर्धार पक्का केला असून हा थरांचा थरथराट अनुभवायला मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाण्यात येणार असल्याचे संकेत मनसैनिकांकडून मिळत आहेत. ठाणे महापालिकेच्या निवडणुकांवर डोळा ठेवून राज हे निवडणूक प्रचाराची हंडी फोडणार असल्याची कुजबूज आहे.बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने दहीहंडीच्या उंचीबाबत दिलेल्या निर्णयावर गुरुवारी राज ठाकरे यांनी संताप व्यक्त करताच सायंकाळी ठाणे मनसेने ९ थरांची हंडी आणि ११ लाखांचे बक्षीस जाहीर केले. मनसेने ९ थर लावून हंडी फोडण्याची घोषणा केल्याने आतापर्यंत ठाणे-मुंबईतील सुमारे ११५ गोविंदा पथकांनी त्यांच्याशी संपर्क साधून नावनोंदणी केली आहे. विशेष म्हणजे यात सर्वाधिक पथके मुंबईतील असून ठाण्यातील २२ ते २३ पथके आहेत. ज्या पथकांचा ९ थरांचा उत्तम सराव झाला आहे, अशा मुंबईतील दोन पथकांना मनसेने विशेष निमंत्रण दिले आहे. थरांच्या स्पर्धेतील बक्षीस मिळवण्यासाठी उगाच इतर पथकांना साहस करण्याची संधी आम्ही देणार नाही. मात्र, शक्य तितके थर लावणाऱ्या प्रत्येक पथकाला बक्षीस दिले जाणार आहे, अशी माहिती ठाणे मनसेचे शहराध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली. ९ थर लावणाऱ्यांमध्ये ठाण्यातील गोविंदा पथके नसली तरी ठाण्यातील ४ मोठ्या गोविंदा पथकांचा आठ थरांचा सराव झाला असून त्यांच्याकडून तेवढे थर लावण्याची अपेक्षा आहे. विष्णूनगर येथील भगवती मैदानात पारंपरिक पद्धतीने ढोलताशांच्या गजरात साजऱ्या होणाऱ्या दहीहंडी उत्सवाला उपस्थित राहण्यासाठी व ९ थर लागलेले पाहण्याकरिता राज ठाकरे यांना ठाणे मनसेने आमंत्रण दिले असून हंडीच्या दिवशीही त्यांचा उत्साह वाढवायला ते ठाण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. >निवडणुकांवर ठेवून लक्ष; हंडीला केले लक्ष्यमुंबई, ठाणे येथील महापालिका निवडणुका जवळ येत असून ठाण्यात शिवसेनेचे नेते दहीहंड्या लावतात. न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध सर्वप्रथम राज यांनी आवाज उठवला व त्यानंतर शिवसेनेने मुखपत्रातून निर्णयाचा समाचार घेतला. दहीहंडीवरील निर्बंधांना हिंदूंच्या सणावरील टाच असा रंग राज यांनी दिला असून हाच मुद्दा निवडणुकीचा व राजकारणाचा मुद्दा म्हणून वापरण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे मनसेने ठाण्यातील दहीहंडीकरिता आपली सर्व ताकद पणाला लावली आहे.