शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
4
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
5
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
8
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
9
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
10
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
11
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
12
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
13
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
14
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
15
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
16
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
17
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
18
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
20
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक

राज ठाकरेंकडून सेना-भाजपाची तुलना लढणाऱ्या कोंबड्याशी

By admin | Updated: February 14, 2017 20:13 IST

निवडणुका जाहीर झाल्यपासून शिवसेना-भाजपा यांच्यात भांडणे सुरु आहेत. त्यांच्यात सुरु असलेल्या भांडणाशी मुंबईकरांचा काहीही संबंध नाही.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 14 - " निवडणुका जाहीर झाल्यापासून शिवसेना-भाजपा यांच्यात भांडणे सुरू आहेत. त्यांच्यात सुरू असलेल्या भांडणाशी मुंबईकरांचा काहीही संबंध नाही. मुलगा अमित आजारी असल्यामुळे प्रचाराला उशिरा सुरुवात केली. पण मी नसताना पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराला जोमाने सुरुवात केली, त्यांचं अभिनंदन करतो. शिवसेना-आणि भाजपाच्या सुरू असलेल्या आरोप प्रत्यरोपावर अप्रत्यक्ष टीका करताना त्यांची तुलना कोंबडीच्या झुंजीशी केली आहे. निव़डणुकीनंतर हे पुन्हा एकत्र येतील,"  असा टोला राज ठाकरे यांनी सेना भाजपावर लगावला. पुढे बोलताना त्यांनी मोदींच्या नोटाबंदीचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले,  " नोटाबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की एक नवा भारत तयार होईल. नोटाबंदीनंतर नवा भारत कुठे आहे? हे सांगा. असा सवाल त्यांनी मोदींच्या नोटाबंदीवर उपस्थितीत केला. नोटाबंदीनंतर काय बदललं? पूर्वीचीच परिस्थिती कायम आहे, केवळ लोकांना त्रास झाला. सगळीकडे कॅश चालू आहे, कॅशलेस भारत कुठे गेला? नोटाबंदीने काय साध्य झालं, त्याचं उत्तर पंतप्रधानांनी द्यावं असेही राज ठाकरे म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी शिवसेना-भाजपावर ठाकरी शैलीत टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पारदर्शी कारभारवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शिवसेनेवर टीका करताना त्यांनी 25 वर्षाच्या मुंबई महानगरपालिकेतील कारभारवर प्रश्न उपस्थितीत केला. शिवसेने बाळासाहेबांच्या नावाचा वापर करू नये. बाळासाहेबांनी करुन दाखवलं तुम्ही त्यांसारखं काम करु शकत नाहीत असेही ते म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले शिवसेने 25 वर्ष मुंबईत सत्ता उपभोगली त्यांना कोणीही प्रश्न विचारत नाही ह्यांना प्रश्न विचारण्यासाठी राज ठाकरे भेटतो का? म्हणे राज ठाकरेंनी नाशिक महानगर पालिकेत काय केलं ? असे ते म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी नाशिक मध्ये केलेल्या कामाचा थोडक्यात आढावा दिला.

राज ठाकरेंच्या भाषणातील मुद्दे - - भाजपाकडे रगड्ड पैसा आहे? तो पैसा आला कठून - भाजपला उमेदवार मिळत नाही, उमेदवार फोडायला पैसे वाटप करतायत - महापालिकेत शिवसेनेने भ्रष्टाचार केला असेल, पण भाजपही त्यांच्याचसोबत आहे- शिवसेना-भाजपने आपापले क्लब उभे केले, मुंबईकरांच्या हाताला काय लागलं? - मुंबईतील रस्त्यांमध्ये खड्डे आहेत आणि कसली पारदर्शकता सांगताय?- पाचपैकी 2 वर्ष नाशिक महापालिकेला आयुक्तच दिला नाही, तरीही कारभार केला - नाशिकचं बोटॅनिकल गार्डन पाहून रतन टाटांनीही पाठ थोपटली- सेनेनं 25 वर्षांत जे केलं नाही ते आम्ही 5 वर्षांत नाशिकमध्ये केलं - पुढची 40 वर्ष नाशिकमध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही- मराठी शाळा बंद करतायत आणि उर्दू शाळा काढत आहेत- बाळासाहेबांच्या नावाखाली तुमचा भ्रष्टाचार खपवू नका- महापौर बंगला हडपण्यासाठी बाळासाहेबांचं नाव पुढे केलं जातंय- महापौर कुठे जाणार राणीच्या बागेत, तिथे बरेच पिंजरे खाली आहे - दरवर्षी 100 कोटी रुपये फक्त खड्डे बुजवायला देणारी मुंबई एकमेव महापालिका- जगभरात कुठेही खड्डे भरण्यासाठी कंत्राट निघत नाही पण मुंबईत निघतात- नाशिकमध्ये पाच वर्षात झालं, ते मुंबईत 25 वर्षात झालं नाही - पार्टी विथ डिफेन्स म्हणजे आमच्याकडे पैसे नाही आणि तुमच्या कडे आहे- मुख्यमंत्र्यांवर कोण विश्वास ठेवेल. यांच्या खिशाला भोकं पडलीये, शिवस्मारक उभं करायला पैसे तरी आहेत का ? - दोन कोंबडी झुंझत होती निवडणुका झाल्या की पुन्हा येणार जवळ- भाजप-सेनेच्या भांडणाचा पालिका निवडणुकीशी काय संबंध- शहरं बकाल होतायत पण कुणाचंच लक्ष नाही- नोटाबंदीनंतर नवा भारत कुठे आहे ?- नोटाबंदीने काय साध्य झालं, त्याचं उत्तर पंतप्रधानांनी द्यावं- नोटाबंदीनंतर काय बदललं? पूर्वीचीच परिस्थिती कायम आहे, केवळ लोकांना त्रास झाला - गळीकडे कॅश चालू आहे, कॅशलेस भारत कुठे गेला?