शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

राज यांना आता आर्थिक निकष का आठवला?

By admin | Updated: October 4, 2016 05:09 IST

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आर्थिक निकषावर आरक्षण देण्याची भूमिका सातत्याने मांडली, पण त्यांनी इतरांच्या आरक्षणाला कधीही विरोध केला नव्हता

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आर्थिक निकषावर आरक्षण देण्याची भूमिका सातत्याने मांडली, पण त्यांनी इतरांच्या आरक्षणाला कधीही विरोध केला नव्हता. मात्र, शिवसेनेच्या मुखपत्रात छापून आलेल्या व्यंगचित्राबद्दल एक शब्द न उच्चारणाऱ्या राज ठाकरे यांना मराठा समाजाला आरक्षण देण्याची वेळ आली की आर्थिक निकषाचा मुद्दा का आठवला, असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत केला.शिवसेनेच्या मुखपत्रातील आक्षेपार्ह व्यंगचित्राबद्दल खा. संजय राऊत यांनी आधीच माफी मागितली असती, तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना माफी मागण्याची वेळच आली नसती. पण कदाचित राऊत हे उद्धव यांच्यापेक्षाही श्रेष्ठ असावेत, असा चिमटाही राणे यांनी काढला.राणे म्हणाले, आजच्या काळात आर्थिक निकषांवर आरक्षण देण्याची भूमिका घेताना कोणाचेही एक टक्का तरी आरक्षण काढणे शक्य आहे का? ते कोणीही करून पाहावे, मग काय घडू शकते ते त्यांना कळेल. आम्ही सरकारमध्ये असताना तामिळनाडूच्या धर्तीवर राज्यात आरक्षणाची भूमिका मांडली होती. राज्यघटनेच्या कलम १५ (४) व कलम १६ (४)नुसार आमच्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले होते, पण ते कोर्टात टिकले नाही. कारण आम्ही १८ लाख लोकांशी संवाद साधून तयार केलेला अहवाल न्यायालयाने पाहिला नाही, असेही ते म्हणाले. व्यंगचित्रामुळे शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकली. माफी मागितली नाही, तर पक्ष टिकेल की नाही अशी त्यांना भीती होती. आरक्षणाबाबत कोर्टात कोणते मुद्दे मांडायचे याविषयी भाजपा-शिवसेनेचे एकमत होत नाही, असा आरोपही राणे यांनी केला.