शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘रयत’च्या अध्यक्षपदाचा पवारांचा ‘रौप्यमहोत्सव’ बिनविरोध निवड : सचिवपदी गणेश ठाकूर

By admin | Updated: May 10, 2014 01:42 IST

आशिया खंडातील नामांकित शिक्षण संस्था असणार्‍या ‘रयत’मध्ये सबकुछ शरद पवार असल्याचे आज (शुक्रवार) पुन्हा एकदा स्पष्ट झाले.

सातारा : आशिया खंडातील नामांकित शिक्षण संस्था असणार्‍या ‘रयत’मध्ये सबकुछ शरद पवार असल्याचे आज (शुक्रवार) पुन्हा एकदा स्पष्ट झाले. संस्थेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा त्यांची बिनविरोध निवड झाली. १९८९ पासून ‘रयत’च्या अध्यक्षपदी पवार आहेत. आज झालेली त्यांची निवड ९ मे २०१७ पर्यंत आहे. त्यांनी अध्यक्षपदाची सूत्रे घेतली आणि अध्यक्षपदावरील त्यांची आज २५ वर्षे पूर्ण झाली. दरम्यान, सचिवपदी डॉ. गणेश ठाकूर, तर माध्यमिकच्या सहसचिवपदी उत्तमराव आवारी आणि उच्च माध्यमिक सहसचिवपदी डी. डी. पाटील यांची निवड झाली. ‘रयत’चे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ५५ व्या पुण्यतिथीनिमित्त झालेल्या मुख्य कार्यक्रमानंतर मुख्य कार्यालयात संस्थेची सर्वसाधारण सभा झाली. त्यावेळी या निवडी करण्यात आल्या. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शिवाजी विद्यापीठाचे विष्णू खाडे आणि शामसुंदर गोखले यांनी काम पाहिले. ‘रयत’च्या कार्यकारिणीत पाच उपाध्यक्ष, सचिव आणि २४ व्यवस्थापन परिषद सदस्यांचा समावेश आहे. उपाध्यक्षपदी जयश्री चौगुले, एस. एम. पाटील, शिवाजीराव पाटील, दादासाहेब कळमकर, गोपी किसन पाटील यांची निवड झाली. व्यवस्थापन परिषदेत अ‍ॅड. रावसाहेब शिंदे, डॉ. अनिल पाटील, डॉ. एन. डी. पाटील, शंकरराव कोल्हे, डॉ. पतंगराव कदम, उपमुख्यमंत्री अजित पवार, आबासाहेब देशमुख, रामशेठ ठाकूर, आमदार गणपतराव देशमुख, विजय कोलते, अ‍ॅड. भगीरथ शिंदे, अशोकराव काळे, अ‍ॅड. रवींद्र पवार, रामचंद्र गायकवाड, कृष्णराव घाटगे तर ‘लाईफ मेबंर्स’मधून प्राचार्य डॉ. जे. जी. जाधव, प्राचार्य दिलीप कदम, प्राचार्य डॉ. अशोक भोईटे, प्राचार्य डॉ. नानासाहेब गायकवाड, किसन रत्नपारखी, प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर आणि ‘लाईफ वर्कर्स’तर्फे डॉ. पंजाबराव रोंगे, प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर, प्राचार्य डॉ. अरुण आंधळे यांचा समावेश करण्यात आला. या निवडी तीन वर्षांसाठी आहेत. (प्रतिनिधी)