शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकर स्मारक लोकसहभागातून उभारा - दलाल

By admin | Updated: October 6, 2015 03:07 IST

राजकारण्यांबद्दल सध्या मीडियापासून मतदारांपर्यंत टीकेचा सूर लावला जात असताना माजी विधान परिषद सदस्य प्रभाकर दलाल यांनी इंदू मिलच्या जमिनीवर उभ्या राहत असलेल्या

मुंबई : राजकारण्यांबद्दल सध्या मीडियापासून मतदारांपर्यंत टीकेचा सूर लावला जात असताना माजी विधान परिषद सदस्य प्रभाकर दलाल यांनी इंदू मिलच्या जमिनीवर उभ्या राहत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या उभारणीकरिता ५ हजार रुपयांची देणगी दिली आहे. राज्य आर्थिक अडचणीत असताना लोकसहभागातून हे स्मारक उभे करा, अशी सूचना दलाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे.दलाल मूळचे काँग्रेसचे. त्यानंतर त्यांनी एस.एम. जोशी यांच्या नेतृत्वाखाली समाजवादी चळवळीत सहभाग घेतला. दलाल यांचे वय ८९ वर्षे असून, ते १९६८ ते ७४ या कालावधीत विधान परिषदेचे सदस्य होते. दीर्घकाळ चार्टर्ड अकाउंटंट म्हणून काम केलेल्या दलाल यांनी मुख्यम^ंत्र्यांना पत्र लिहिले व त्यासोबत मुख्यमंत्री निधीत स्मारकासाठी ५ हजारांचा धनादेश पाठवून दिला. दलाल पत्रात म्हणतात की, या स्मारकाची बऱ्याच वर्षांपासून प्रतीक्षा होती. स्मारकाकरिता अनेक कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याचे वृत्तपत्रात वाचले. पुढील पिढ्यांना स्फूर्तिदायक ठरणारे हे स्मारक उभे राहिलेच पाहिजे. मात्र त्याकरिता सर्व खर्च शासनाने करणे बरोबर नाही. लोकसहभागातून स्मारक उभे राहण्याकरिता शासनाने निम्मा खर्च करावा व निम्मा खर्च या स्मारकाची मागणी सातत्याने लावून धरणारे, यापूर्वी याच स्मारकाकरिता ज्यांनी प्रयत्न केले त्यांनीही केला पाहिजे. (विशेष प्रतिनिधी)