शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

पश्‍चिम विदर्भातील चार जिल्ह्यात रिमझिम पाऊस

By admin | Updated: October 26, 2014 00:50 IST

रब्बीसह खरिप पिकांनासाठी ठरणार उपयुक्त

अकोला: रब्बी हंगामातील पेरण्यांसाठी पावसाची आतुरतेने प्रतीक्षा केली जात असतानाच, शनिवारी पश्‍चिम विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा व वाशिम या चार जिल्ह्यांमध्ये रिमझिम पावसाने हजेरी लावली. विभागातील यवतमाळ जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून, काही ठिकाणी तुरळक स्वरुपाचा पाऊस झाला. हा पाऊस रब्बी पेरण्यांसह खरीप पिकांसाठीही उपयुक्त ठरणार असल्याचे, कृषी विभागाचे म्हणणे आहे.यावर्षी पावसाळ्यास तब्बल सव्वा महिना उशिराने झालेला प्रारंभ आणि त्यानंतरही पावसाचे कमी प्रमाण, यामुळे खरीप हंगामातील मूग, उडीद इत्यादी कमी कालावधीच्या पिकांची अत्यल्प प्रमाणात पेरणी झाली. दुसरीकडे गत काही वर्षांपासून, कापसाला मागे टाकून विभागातील प्रमुख पिकाचा मान पटकाविलेल्या सोयाबीनचे एकरी उत्पादन केवळ ५0 किलो ते एक क्विंटलपर्यंत घसरल्याने, पश्‍चिम विदर्भातील शेतकरी हवालदिल झाला आहे. पिके बुडाल्याने, यंदा शेतकरी दिवाळी साजरी करू शकला नाही.खरिपातील नुकसान निदान रब्बी हंगामात तरी भरुन काढता येईल, या आशेने शेतकर्‍यांनी रब्बी हंगामातील पेरणीची तयारी सुरु केली असली तरी, जमिनीत पेरणीयोग्य ओलावा नसल्याने, अद्यापही सार्वत्रिक रब्बी पेरण्या सुरू झालेल्या नाहीत. शेतकर्‍यांना रब्बी पेरण्यांसाठी पावसाची प्रतीक्षा होती. शनिवारी सकाळपासूनच अकोला, बुलडाणा जिल्ह्यात रिमझिम पावसाने हजेरी लावली, तर अमरावती व वाशिम या दोन जिल्ह्यांमध्ये तुरळक पाऊस झाला. यवतमाळसह विभागातील पाचही जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण होते. रिमझिम पावसामुळे हरभरा, करडी आदी रब्बी पिकांच्या रखडलेल्या पेरण्या सुरू होण्याची अपेक्षा, कृषी विभागातर्फे व्यक्त केली जात आहे. हा पाऊस खरीप हंगामातील कपाशी पिकासाठीही उपयुक्त ठरणार आहे. रिमझिम पाऊस हरभरा, करडी आदी रब्बी पिकांसह, खरीप हंगामातील कपाशी पिकासाठीही उपयुक्त ठरणार आहे. पाऊस झालेल्या भागात शेतकर्‍यांनी रब्बी पिकांची पेरणी सुरु करण्यास अडचण नाही. ढगाळ वातावरण कायम राहिल्यास, कपाशी पिकावर किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कृषी सह संचालक एस. आर. सरदार यांनी वर्तवली आहे.*सोयाबीन भिजले!शनिवारी झालेल्या रिमझिम पावसामुळे कापणी न झालेले सोयाबीन पावसामुळे शेतातच भिजले. कापणीला आलेले सोयाबीन भिजल्याने, शेतकर्‍यांचे नुकसान झाले. आधीच उत्पादन कमी असल्याच्या स्थितीत हाताशी आलेले सोयाबीन भिजल्याने, शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.*कपाशीवर किडींच्या प्रादुभार्वाची शक्यता!अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. हे वातावरण आणखी काही दिवस कायम राहिल्यास, कपाशी पिकावर किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता, कृषी तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.