शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचा दगा; २ लाख हेक्टवरील सोयाबीनला फटका !

By admin | Updated: August 23, 2016 17:20 IST

जिल्ह्यात यंदा सोयाबीन पिकाखालील क्षेत्रात तब्बल दुप्पटीने वाढ झाली. सोयाबीनचे सरासरी क्षेत्र १ लाख ७ हजार हेक्टर आहे.

शेतकरी चिंतातूर : शेंगा भरण्याच्या अवस्थेत असतानाच पावसाने वटारले डोळेबाबूराव चव्हाण/ ऑनलाइन लोकमतउस्मानाबाद, दि. २३ : जिल्ह्यात यंदा सोयाबीन पिकाखालील क्षेत्रात तब्बल दुप्पटीने वाढ झाली. सोयाबीनचे सरासरी क्षेत्र १ लाख ७ हजार हेक्टर आहे. प्रत्यक्षात २ लाख ८ हजार ९६६ हजार हेक्टर क्षेत्रावर विक्रमी पेरणी झाली. जुलैअखेरपर्यंत झालेल्या सततच्या रिमझीम स्वरूपाच्या पावसामुळे सर्वच पिके जोमदार आली. परंतु, हे पिके ऐन वाढीच्या तसेच शेंगा भरण्याच्या अवस्थेत असतानाच वीस ते बावीस दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे थोडेथोडके नव्हे, तर तब्बल दोन लाख हेक्टवरील सोयाबीन अखेरच्या घटका मोजत आहे.

पाच वर्षांपासून सातत्याने जिल्ह्यातील सोयाबीनच्या क्षेत्र वाढ होत आहे. खरीप हंगामाच्या एकूण सरासरी क्षेत्रापैकी चाळी ते बेचाळीस टक्के क्षेत्र सोयाबीन पिकाने व्यापले आहे. यंदा जून महिन्यात वरूणराजाची चांगली कृपा झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनीही चाढ्यावर मुठ धरण्यास विलंब केला नाही. परिणामी पेरणीच्या टक्केवारीने शंभरी (१०६ टक्के) ओलांडली. जुलै महिन्यातील पावसाची सरासरी १५१ मिमी असताना प्रत्यक्ष २०३ मिमी पर्जन्यमान झाले. त्यामुळे सर्वच पिकांची वाढ अपेक्षिापेक्षाही चांगली झाल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण होते. अनेक शेतकऱ्यांनी पिके पदरात पडणारच, असे गृहित धरून विमाही उतरविला नाही.

असे असतानाच आॅगस्ट महिन्यात पावसाने डोळे वटारले. आज-उद्या पाऊस पडेल, अशी अपेक्षा असतानाच वीस ते बावीस दिवसांचा कालावधी लोटला. परंतु, पावसाचा थेंबही पडलेला नाही. त्यामुळे विशेष: सोयाबीन पिकाला जबर फटका बसला आहे. शेंगा भरण्याच्या तसेच वाढीच्या अवस्थेत असलेली सुमारे २ लाख ८ हजार हेक्टरवरील ही पिके अक्षरश: अखेरच्या घटका मोजत आहे. हलक्या प्रतीच्या जमिनीवरील पिके करपून चालली आहेत. त्यामुळे दुष्काळाच्या भयान संकटातून मोठ्या हिम्मतीने कसेबसे बाहेर पडण्याचा प्रयत्न करणारा बळीराजा पुन्हा अडचणीत आला आहे. काही शेतकऱ्यांनी थोड्याफार उपलब्ध पाण्याच्या माध्यमातून तुषार सिंचन पद्धतीने पिके जगविण्यासाठीची कसरत सुरू केली आहे. परंतु, विद्युत भारनियमनामुळे हे प्रयत्नही अपुरे पडत आहेत.

काय आहे पिकांची अवस्था?जिल्हाभरात ४७ हजार ८५० हेक्टवर उडीद आहे. हेही पीक शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. सुमारे २६ हजार हेक्टवर मुग आहे. शेंगा पक्वतेच्या अवस्थेत आहेत. ९ हजार ८६० हेक्टवर बाजरीचे पीक आहे. हे पीक वाढीच्या अवस्थेत आहे. तूर पिकाखालील क्षेत्रातही मोठी वाढ झाली आहे. ९७ हजार ५०० हेक्टर सरासरी क्षेत्र असताना प्रत्यक्ष १ लाख ११ हजार ७३८ हेक्टवर पेरणी झाली आहे. पीक वाढीच्या अवस्थेत आहे. कापसाची लागवड १९ हजार ७५ हेक्टवर झाली आहे. हे पीक वाढीच्या अवस्थेत आहे. मका पिकाखाली २२ हजार ९८ हेक्टवर क्षेत्र आहे. हे पीक सुद्धा वाढीच्या अवस्थेत आहे. परंतु, वीस ते बावीस दिवसांपासून पावसाने ओढ दिल्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. तर हलक्या जमिनीवरील पिके करपून चालली आहेत. सरासरीच्या ५० टक्केही पाऊस नाहीजिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान ७६७.५ मिमी एवढे आहे. २२ आॅगस्टअखेर केवळ ३७४.१ मिमी म्हणजेच ४८.७ टक्के पाऊस झाला आहे. यापैकी जून महिन्यात १२७.४ मिमी, जुलै महिन्यात २०३.९ मिमी आणि आॅगस्ट महिन्यात (आजपर्यंत) ४२.८ मिमी म्हणजेच या महिन्याच्या सरासरीच्या २० टक्के पाऊस पडला. जिल्ह्यात ४२ महसूल मंडळे आहेत. यापैकी १३ मंडळे अशी आहेत, की जेथे ३०० मिमी पेक्षाही कमी पाऊस झालेला आहे. विशेषत: या भागातील पिके सध्या करपून जाण्याच्या मार्गावर आहेत. पिके वाढीच्या आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत असतानाच पावसाने डोळे वटारले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आता आभाळाकडे लागल्या आहेत.----------------