शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

घुंगरु वाजल्यानंतर पडतो पाऊस !

By admin | Updated: July 13, 2016 19:01 IST

होमहवन केल्यानंतर किती पाऊस पडतो हा संशोधनाचा विषय असला तरी मल्हार राग आळवला की पाऊस पडतो म्हणतात़

अरविंद हजारे/ऑनलाइन लोकमत

जवळा (अहमदनगर), दि. 13 - पावसासाठी अनेक ठिकाणी होमहवन केले जातात. होमहवन केल्यानंतर किती पाऊस पडतो हा संशोधनाचा विषय असला तरी मल्हार राग आळवला की पाऊस पडतो म्हणतात़ पण जामखेड तालुक्यातील जवळा येथे नर्तिकांच्या पायातील घुंगरांचा आवाज झाला की हमखास पाऊस पडतो अशी आख्यायिका आहे़ म्हणूनच गावात आषाढी एकादशीला नर्तिका पायात घुंगरु चढवतात़जामखेड तालुक्यातील जवळा येथे आषाढी एकादशीनिमित्त शुक्रवारी (दि़१५) रथयात्रेस प्रारंभ होत आहे. जवळेश्वर यात्रेमध्ये नृत्यांगना मोठ्या प्रमाणात नृत्य करण्यासाठी येतात. गावातील प्रत्येक मंडळाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या नर्तिकांच्या पायातील घुंगरु वाजल्यानंतर पाऊस पडतो, अशी आख्यायिका आहे. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे़ मात्र, जवळा येथे अद्याप पाऊस नाही़ दरवर्षी आषाढी एकादशीनंतर जवळा येथे मोठा पाऊस होतो़ आषाढी एकादशीनिमित्त गावात आलेल्या नर्तिकांच्या घुंगरांच्या आवाजामुळेच पाऊस पडतो, अशी येथील पिढीजात धारणा आहे़ त्यामुळे या यात्रेला मोठे महत्व असते़ ही रथयात्रा १९ जुलैपर्यंत चालणार आहे. ही रथयात्रा आषाढ शुद्ध एकादशी ते गुरुपौर्णिमा असे ५ दिवस चालते. आषाढी एकादशीच्या दिवशी जवळ्याचे ग्रामदैवत जवळेश्वराची आरती करून रथयात्रेस प्रारंभ होतो. गावातील एकूण १० मंडळांच्या नाचगाण्याचा कार्यक्रम रात्रभर चालतो. नर्तिकांच्या नाचगाण्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी जवळा पंचक्रोशीतील हजारो लोक येतात. पहिल्या दिवशी सर्व मंडळांच्या नर्तिका जवळेश्वर मंदिरात येऊन जवळेश्वराची आरती करतात. यात्रेमध्ये विद्युत रोषणाई डोळे दिपवणारी असते. शेवटच्या दिवशी म्हणजे ५ व्या दिवशी जवळेश्वराच्या मुकुटाची रथामध्ये प्रतिष्ठापना केली जाते. दुपारी जवळेश्वराची आरती करून मुख्य रस्त्याने मिरवणूक निघते. रथासमोर नर्तिकांच्या नाचगाण्याचा कार्यक्रम असतो. रथास मोठमोठे दोर लावून ओढले जाते. रथ ओढण्यास ५० ते ६० लोक लागतात. रथाला नारळाचे तोरण अर्पण करतात. जवळजवळ ३०,४० हजार नारळांचे तोरण रथात असते.१०० वर्षांचा रथ राज्यातील सर्वांत मोठा साधारण १०० वर्षांपूर्वीचा हा रथ आहे. १९ व्या शतकाच्या सुरुवातीला येदू सुरवसे या सुताराने तो तयार केला आहे. त्यामुळे रथात बसण्याचा मान सुरवसे परिवाराला आहे. अजून रथाची कसलीही मोडतोड झालेली नाही. दरवर्षी रथास तेल लावून मगच त्यात मूर्ती प्रतिष्ठापना केली जाते.