शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

आज रेल्वे प्रवाशांचे होणार मेगाहाल!

By admin | Updated: July 16, 2017 01:13 IST

उपनगरी रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे रुळांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी मध्य रेल्वे मार्गावर रविवार, १६ जुलै रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार

मुंबई : उपनगरी रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे रुळांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी मध्य रेल्वे मार्गावर रविवार, १६ जुलै रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेन लाइनवर विक्रोळी ते दिवा स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर, तर हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत.मेन लाइनवर विक्रोळी ते दिवा स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर सकाळी ११.३० ते दुपारी ४.३० वाजेपर्यंत दुरुस्तीची कामे करण्यात येतील. ब्लॉकदरम्यान विक्रोळी ते दिवा मार्गावरील डाऊन जलद वाहतूक डाऊन धिम्या मार्गावरून चालवण्यात येईल. परिणामी, डाऊन धिम्या मार्गावरील लोकल कांजूरमार्ग, नाहूर, कळवा आणि मुंब्रा या स्थानकांवर थांबणार नाहीत. तर डाऊन आणि अप जलद मार्गावरील लोकलना सकाळी १०.४८ ते दुपारी ४.०२ या वेळेत दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी आणि घाटकोपर या स्थानकांवर थांबा देण्यात येईल. यामुळे या गाड्या निर्धारित वेळेपेक्षा १५ ते २० मिनिटे उशिराने धावणार आहेत. ब्लॉकदरम्यान मुंबईत धिम्या मार्गावरून येणाऱ्या गाड्या सकाळी ११ ते संध्याकाळी ५ या वेळेत निर्धारित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिराने पोहोचतील.

कुर्ला ते वाशी मार्ग बंद हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत दुरुस्तीची कामे करण्यात येतील. ब्लॉकदरम्यान हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक सकाळी १०.२० ते दुपारी ३.४८ वाजेपर्यंंत कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान बंद राहणार आहे. हार्बर मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेलदरम्यान स्पेशल ट्रेन चालवण्यात येतील. हार्बर मार्गावरील प्रवासी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत ट्रान्स हार्बर आणि मेन लाइनने प्रवास करू शकतात.परेचा जम्बोब्लॉकपश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी बोरीवली ते अंधेरी स्थानकांदरम्यान जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत अप आणि डाऊन धिम्या मार्गावर दुरुस्तीची कामे करण्यात येतील. ब्लॉकदरम्यान बोरीवली ते अंधेरी दरम्यानची अप आणि डाऊन धिम्या मार्गावरील लोकलची वाहतूक अप आणि डाऊन जलद मार्गावरून चालवण्यात येईल. तसेच अप आणि डाऊन मार्गावरील काही लोकल गाड्या रद्द करण्यात येणार आहेत़ राममंदिर स्थानकापवर अप आणि डाऊन मार्गावरील लोकल थांबणार नाहीत.