शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रायकर, कुवळेकर, जोशी यांना जीवनगौरव पुरस्कार

By admin | Updated: January 29, 2015 06:01 IST

पत्रकारितेच्या क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव आणि योगदानाबद्दल ‘लोकमत’चे समूह संपादक दिनकर रायकर (२०१३), ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर

मुंबई : पत्रकारितेच्या क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव आणि योगदानाबद्दल ‘लोकमत’चे समूह संपादक दिनकर रायकर (२०१३), ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर (२०१२) आणि ल. त्र्यं. जोशी (२०११) यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार देऊन राज्य शासनाच्यावतीने त्यांचा गौरव करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे पत्रपरिषदेत केली. एक लाख रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. गेल्या तीन वर्षांतील या तीन पुरस्कारांचा वितरण समारंभ ४ फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजता येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात होणार आहे. ‘लोकमत’चे समूह संपादक असलेले दिनकर रायकर यांना पत्रकारितेचा सुमारे ५० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. इंडियन एक्स्प्रेसचे वार्ताहर ते मुंबई आवृत्तीचे संपादक तसेच लोकमत आणि लोकमत टाइम्सच्या औरंगाबाद आवृत्तीचे संपादक म्हणून  त्यांनी काम पाहिले. पत्रकारितेतील अनेक पुरस्कारांचे ते मानकरी ठरले आहेत. कुवळेकर यांना ३३ वर्षांच्या पत्रकारितेचा प्रदीर्घ अनुभव असून लोकमत, सकाळचे मुख्य संपादक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. लक्ष्मणराव जोशी हे नागपूरच्या लोकशाही वार्ताचे संपादक असून ४५ वर्षांहून अधिक काळ ते पत्रकारितेत आहेत. तरुण भारतचे संपादक म्हणून त्यांची कारकिर्द विशेष गाजली. गोमंतक, गोवादूतचेही ते संपादक होते. राज्य शासनाच्या वतीने विविध गटांत देण्यात येणाऱ्या गेल्या तीन वर्षांतील पत्रकारिता पुरस्कारांची घोषणाही आज झाली. २०११ मधील अन्य पुरस्कार प्राप्तकर्त्यांमध्ये शेख रिजवान,खलिल, इरशाद बागवान, नागेश दाचेवार, भिकाजी चेचर, चारु शीला कुलकर्णी, रवी गाडेकर, अमिता बडे, गणेश कोरे, जान्हवी सराटे यांचा समावेश आहे. (विशेष प्रतिनिधी)> पुरस्कारांवर लोकमतची छापविविध गटांतील पत्रकारिता पुरस्कारांवर लोकमतने मोहोर उमटविली. लोकमत समाचार; जळगावचे मुकेश शर्मा यांना बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (४१ हजार), लोकमतचे रत्नागिरी तालुका प्रतिनिधी शिवाजी नामदेव गोरे यांना शि.म.परांजपे पुरस्कार (४१ हजार), लोकमत; अकोलाचे वरिष्ठ उपसंपादक नरेंद्र बेलसरे यांना लोकनायक बापुजी अणे पुरस्कार (४१ हजार), लोकमत; नागपूरचे उपसंपादक मिलिंद कीर्ती यांना ग.त्र्य.माडखोलकर पुरस्कार (४१ हजार), लोकमत; मुंबईचे वरिष्ठ प्रतिनिधी जमीर काझी यांना आचार्य अत्रे पुरस्कार (४१ हजार), लोकमत; नागपूरचे वरिष्ठ उपसंपादक चंद्रशेखर बोबडे यांना ग.त्र्यं.माडखोलकर पुरस्कार (४१ हजार), लोकमत; नागपूरचे उपसंपादक चंद्रशेखर गिरडकर यांना ग.त्र्यं.माडखोलकर पुरस्कार (४१ हजार) आणि लोकमत; साताराचे वार्ताहर मोहन मस्कर-पाटील (४१ हजार) हे मानकरी ठरले.