शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
3
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
4
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
5
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
6
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
7
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
8
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
9
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
10
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
11
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
12
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
13
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
14
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
15
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
16
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
17
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
18
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
19
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
20
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
Daily Top 2Weekly Top 5

रायगड पोलिसांचे जबाब नोंदवले

By admin | Updated: November 26, 2015 03:06 IST

खळबळजनक शीना बोरा खूनप्रकरणी सीबीआयने तत्कालीन पोलीस अधीक्षक आर.डी. शिंदे वगळता रायगड पोलिसांतील प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याची जबानी नोंदवली आहे

मुंबई : खळबळजनक शीना बोरा खूनप्रकरणी सीबीआयने तत्कालीन पोलीस अधीक्षक आर.डी. शिंदे वगळता रायगड पोलिसांतील प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याची जबानी नोंदवली आहे. त्यात निरीक्षक सुरेश मिरगे आणि एसडीपीओ प्रदीप चव्हाण यांचा समावेश आहे.रायगड जिल्ह्णातील गोगादे या गावी स्थानिक नागरिकांना मानवी अवशेष सापडल्यानंतर पोलिसांनी तपास करताना अपघाती मृत्यूची नोंद केली नव्हती. त्यामुळे सीबीआयतर्फे त्यांची चौकशी करण्यात येत आहे.या प्रकरणी महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक संजीव दयाल यांनी त्यांच्या निवृत्तीच्या दिवशी एक पानाचा अहवाल दिला होता; मात्र त्यावर गृहविभागाचे समाधान झालेले नाही. त्यामुळे शिंदे यांची गृहविभागाने पुन्हा जबानी घेतली होती.सीबीआयने मिरगे, चव्हाण, पोलीस नाईक विनोद भगत, कॉन्स्टेबल्स काशीनाथ म्हात्रे, सुनील सकपाळ, हवालदार संजय मगर यांची जबानी नोंदवली आहे. त्यावेळी हे सर्व जण रायगड पोलिसात होते; मात्र सीबीआयने आतापर्यंत शिंदेंची जबानी नोंदविलेली नाही.मिरगे यांची जबानी सहा पानी आहे. शिंदे यांनी त्यावेळी आपल्याला अपघाती मृत्यूची नोंद करू नका असा आदेश दिला होता, असे मिरगे यांनी त्यांच्या जबानीत म्हटले आहे. माजी पोलीस महासंचालकांनी शिंदे यांची जबानी नोंदवून घेतली होती; पण त्यांना पुन्हा जबानी देण्यास सांगण्यात आले आहे.सीबीआयने यापूर्वीच आयपीएस अधिकारी देवेन भारती, खार पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिनेश कदम यांची जबानी नोंदवून घेतली आहे; तथापि मुंबई पोलिसांतील अन्य पोलिसांची जबानी घेतलेली नाही.