शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

राहुल राजसिंगची नशेत पोलिसांशी हुज्जत

By admin | Updated: September 20, 2016 04:47 IST

‘बालिका वधू’फेम प्रत्यूषा बॅनर्जी हिच्या आत्महत्येप्रकरणातील आरोपी व मॉडेल राहुल राजसिंग पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

मुंबई : ‘बालिका वधू’फेम प्रत्यूषा बॅनर्जी हिच्या आत्महत्येप्रकरणातील आरोपी व मॉडेल राहुल राजसिंग पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. दारूच्या नशेत वाहन चालवित त्याने रविवारी रात्री सांताक्रुझ येथे पोलिसांशी वाद घातला. त्याच्या सोबत असलेली मैत्रीण सोहनी शर्मा हिनेही कारवाई टाळण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यामुळे काहीकाळ पोलीस ठाण्याच्या गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. त्याला नशेत व विनापरवाना वाहन चालविल्याप्रकरणी अटक करून नंतर जामीनावर सोडण्यात आले.राहुल राजसिंग हा रविवारी रात्री सोहनी शर्मा हिच्यासमवेत सांताक्रुझ परिसरातून जात होता. वाहतूक पोलिसांची नाकाबंदी करून ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह’ मोहिमेतर्गंत त्याला अडवून त्याची ‘ब्रेथ अ‍ॅनेलायझर’द्वारे तपासणी केली असता मद्याचे प्रमाण अधिक आढळले. त्यामुळे वाहतूक शाखेचे निरीक्षक श्रीकांत देसाई यांनी त्याच्याकडे वाहन परवान्याची मागणी केली. मात्र त्याने लायसन्स नसल्याचे सांगत हुज्जत घातली. तर सोहनी शर्मा हिने कारवाई केल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करू, असे धमकावले. देसाई त्यांना शांतपणे समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत असतानाही वाद घालत असल्याने त्यांना सांताक्रुझ पोलीस ठाण्यात नेण्यात आले. याठिकाणीही त्यांनी दबाव आणण्याचा प्रयत्न केला. राहुलवर दारू पिऊन वाहन चालवणे, वाहन परवाना न बाळगणे, याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. त्याला नोटीस जारी करून जामिनावर सोडण्यात आल्याचे पोलीस आयुक्तांचे प्रवक्ते अशोक दुधे यांनी सांगितले. दरम्यान, वादग्रस्त मॉडेल राहुल राजसिंग याला त्याची प्रेयसी व टीव्ही मालिकेतील अभिनेत्री प्रत्यूषा बॅनर्जी हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एप्रिलमध्ये अटक झाली होती. याबाबत त्याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे जुलैमध्ये एक मॉडेलचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. (प्रतिनिधी)