शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रहाटकर

By admin | Updated: February 11, 2016 01:39 IST

भाजपा महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष विजया रहाटकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दोन वर्षांनी या आयोगाला अध्यक्षपद मिळाले

मुंबई : भाजपा महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष विजया रहाटकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दोन वर्षांनी या आयोगाला अध्यक्षपद मिळाले आहे. आयोगावर इतर सहा सदस्यांची देखील नियुक्ती करण्यात आहे. विभागनिहाय सदस्यांची नावे अशी, नीता ठाकरे - नागपूर, शोभा वैजीनाथ बेंझर्गे - लातूर, गयाताई कराड - बीड, वृंदा किर्तीकर - मुंबई, देवयानी ठाकरे - जळगाव आणि अ‍ॅड. अशाताई लांडगे - मुंबई. महिला व बालकल्याण विभागाने या नियुक्तीचे आदेश जारी केले आहेत. महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडल्या की महिला आयोगाला अध्यक्षपद नाही, अशा बातम्या कायम येत होत्या. महिलांशी संबंधीत कोणत्याही कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना कायम हा प्रश्न त्यांना विचारला जात असे. आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेल्या रहाटकर या औरंगाबादच्या माजी महापौर असून भाजपाच्या महिला राष्ट्रीय उपाध्यक्षा आहेत.युती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पद नाही. तरीदेखील विविध विभागाचे जीआर, अधिसूचना ‘त्यां’ना पाठविल्या जातात. महिला आयोगाच्या संदर्भात महिला व बाल विकास विभागाचे प्रधान सचिव संजय कुमार यांच्या सहीने काढण्यात आलेल्या या अधिसूचनेची प्रती देखील उपमुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव यांनाही पाठवण्यात आली आहे. आता राज्यात उपमुख्यमंत्री कोण आहेत? व ही प्रत कोणाला द्यायची,असा प्रश्न ही अधिसूचना वाटप करणाऱ्या शिपायाला पडला होता!