शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
3
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
4
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
5
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
6
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
7
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
8
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
9
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
10
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
11
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला
12
२.९५ लाखांपर्यंतचा बंपर डिस्काउंट, Mahindra च्या 'या' ५ गाड्यांवर जबरदस्त ऑफर्स
13
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
14
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
15
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाला मोदक आवडतात; पण उकडीचे की तळणीचे? पद्म पुराणात सापडते उत्तर!
16
Vinod Kambli: बोलायला त्रास होतोय, चालताही येईना; विनोद कांबळींच्या प्रकृतीबद्दल चिंताजनक माहिती
17
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
18
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
19
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
20
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार

30 डिसेंबरनंतर पैसे न मिळाल्यास गुन्हे दाखल करणार- राधाकृष्ण विखे-पाटील

By admin | Updated: December 26, 2016 21:14 IST

नोटाबंदीच्या निर्णयानंतर तब्बल 57 वेळा शुद्धीपत्रक काढावे लागणे हे सरकारच्या चुकीच्या निर्णयाचेच द्योतक आहे.

ऑनलाइन लोकमतनाशिक, दि. 26 - नोटाबंदीच्या निर्णयानंतर तब्बल 57 वेळा शुद्धीपत्रक काढावे लागणे हे सरकारच्या चुकीच्या निर्णयाचेच द्योतक आहे. पंतप्रधानांच्या आश्वासनानुसार येत्या 30 डिसेंबरनंतर जनतेला नोटा उपलब्ध करून न दिल्यास सरकारवर गुन्हे दाखल करावेत. याबरोबरच या 50 दिवसांतील वास्तव परिस्थितीबाबत सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटील यांनी केली. जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकीसंदर्भात सोमवारी (26) पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विखे यांनी सांगितले की, गुजरातच्या नवसारीतील नवीन नोटांची उधळण, भाजपाची सत्ता असलेल्या राज्यांमधून जप्त केलेले काळे पैसे यामुळे त्यांना नोटाबंदीची पुरेपूर कल्पना असल्याचे सिद्ध होते. अच्छे दिन, काळे धन, जनधन खात्यांमध्ये 15 लाख जमा होणार, कॅशलेस इंडिया अशी विविध प्रलोभने देऊन सरकारने जनतेला अक्षरश: मूर्खात काढले आहे. केवळ एक टक्का लोकांकडे असलेल्या काळ्या धनासाठी 99 टक्के देशवासीयांना वेठीस धरले आहे. जितका पैसा चलनातून रद्द झाला तितकाच पुन्हा बँकांमध्ये जमा झाल्याने काळा पैसा कोठे आहे.कॅशलेस इंडिया बनवायचाय तर मग नोटांची छपाई कशासाठी सुरू आहे. मुळात देशभरातील साडेसहा लाख खेड्यांपैकी साडेचार लाख खेड्यांमध्ये बँकाच नाहीत, तर एटीएम कुठून असणार. बहुतांशी खेड्यांमध्ये आठ तासांपेक्षा अधिक काळ वीज नसते. तेव्हा कनेक्टिव्हिटी कशी मिळणार. त्यामुळे कॅशलेसबाबत शंकाच आहे. भाजपा सरकार हे शेतकरी, कामगार, शेतमजुरांविरोधातील सरकार आहे. नोटांबदीच्या निर्णयानंतर शेतमालाचे भाव ६० टक्क्यांनी कोसळल्याचा अहवाल आहे. त्यामुळे या सरकारने शेतकऱ्यास मारणी घातले असून, ताबडतोब कर्जमाफीची घोषणा करावी.देशातील सर्वसामान्य जनता ही सोशिक असून येत्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भाजपाला मोठी किंमत चुकवावी लागेल. पंतप्रधानांच्या आश्वासनानुसार 50 दिवस थांबू, मात्र त्यानंतरही परिस्थिती न सुधारल्यास आंदोलनाची रणनीती ठरविण्यासाठी जानेवारीमध्ये कॉग्रेसची बैठक होणार असल्याचे विखे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. भाजपा म्हणजे इव्हेन्ट मॅनेजमेंटअरबी समुद्रातील शिवस्मारकाचा भूमिपूजन सोहळा पाहता भाजपा सरकार इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी असल्याचे समोर आले आहे. महापुरुषांच्या स्मारकाच्या माध्यमातून सरकार राजकारण करीत असून, किमान त्यांना तरी यापासून दूर ठेवा व जनतेची दिशाभूल करण्याचे काम थांबवा, असे पाटील यांनी सांगितले.खिल्ली उडवू नका उत्तरे द्यादेशात व राज्यात परिस्थिती सारखीच असून काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या आरोपांबाबत खिल्ली उडविण्याऐवजी उत्तर द्या. सरकारने रिझर्व्हे बँकेच्या अधिकारावर अतिक्रमण केले असून, नोटाबंदी करून भारतीय जनतेवर एक प्रकारे सूड उगविल्याचे विखे म्हणाले.